स्थानिक

जय किसान कृषी उद्योग कंपनीकडून शेतकऱ्यांना नाम मात्र दरात औषध किटचे वाटप

ऊस विकास स्पर्धा कार्यक्रमांतर्गत राबविला सामाजिक उपक्रम

जय किसान कृषी उद्योग कंपनीकडून शेतकऱ्यांना नाम मात्र दरात औषध किटचे वाटप

ऊस विकास स्पर्धा कार्यक्रमांतर्गत राबविला सामाजिक उपक्रम

बारामती वार्तापत्र

बारामती येथे भरविलेल्या “ऊस विकास स्पर्धा” या कार्यक्रमाअंतर्गत नाशिक मधील “जय किसान कृषी उद्योग,नाशिक” या निविष्ठा बनविणार्या कंपनी तर्फे सामाजिक उपक्रमाअंतर्गत नाम मात्र दरात 200 शेतकर्यांना औषध किट वाटपाचा कार्यक्रम मा.श्री युगेंद्रदादा पवार यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला तसेच मा. दादांनी ऊस प्लाॅटला भेट, जैविक शेती विषयी माहितीची देवाणघेवाण, हनुमंत वरे यांच्या 50 टनी कांदा चाळीची पाहणी तसेच ड्रोन ने औषध फवारणीचे प्रात्यक्षिक पाहिले.

मा.श्री यूगेंद्रदादा पवार यांचा सत्कार मळद गावचे सरपंच श्री योगेश बनसोडे व उपसरपंच श्री किरण गावडे यांनी केला, याप्रसंगी दादांनी कार्यक्रमात शेतकर्यांनी या पुढील काळात सेंद्रिय शेती करणे गरजेचे असुन तशा शेतमालास मोर्फा तर्फे मार्केटिंग साठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

श्री वैभव तांबे साहेब(उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती) यांनी ठिबक सिंचन, ऊस पाचट न जाळता कुजवने गरजेचे तसेच शेतात बॅक्टेरिया वापरणे काळाची गरज आहे असे सांगितले, श्री विवेक भोईटे सर(मृद शास्त्र तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती) यांनी शेतकर्यांना सेंद्रिय शेती, करार शेती व समुह शेतकर्यांना 60 टक्के अनुदानात कृषी विभागामार्फत गोडाऊन स्किम राबवण्यात येईल असे सांगितले, श्री प्रल्हाद वरे यांनी मोर्फा ही विषमुक्त व सेंद्रिय कंपनी स्थापनेच्या ऊद्देशाबद्दल सविस्तर माहिती दिली, सुत्रसंचालन व प्रस्ताविक श्री प्रशांत शेंडे यांनी केले, आभार श्री गणेश जाधव यांनी मानले.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सौ सुप्रिया शिळीमकर (बांदल)(तालुका कृषी अधिकारी, बारामती), श्री चंद्रकांत मासाळ (मंडल कृषी अधिकारी, बारामती), सौ मनिषा काजळे (कृषी सहाय्यक, मळद-गुनवडी), सौ सुप्रिया पवार(कृषी सहाय्यक, बारामती), श्री विश्वजित मगर(आत्मा, बारामती), श्री शुभम भालेराव (चेअरमन, जयकिसान कृषी उद्योग-नाशिक), श्री अक्षय भोसले (संचालक, जयकिसान कृषी उद्योग-नाशिक), श्री स्वप्निल सुर्यवंशी(अध्यक्ष, प्रगती उद्योग समूह-कराड) तसेच श्री उदय मिठारी (Drone Aeronica Advance Technology Pvt. Ltd. Pune) या सर्व मान्यवरांचा महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्यूडयू फ्री फार्मस असोसिएशन, महाराष्ट्र (मोर्फा), एकता शेतकरी ग्रुप व किरण गोडसे फौंडेशन मळद-बारामती यांचे वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी आयोजक श्री प्रल्हाद वरे (सचिव, महा ऑरगॅनिक अॅन्ड रेस्यूडयू फ्री फार्मस असोसिएशन महाराष्ट्र (मोर्फा)), श्री प्रशांत शेंडे (अध्यक्ष, एकता शेतकरी ग्रुप मळद-बारामती), यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले, तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये श्री भारतनाना गावडे, सदस्य-पंचायत समिती बारामती. अॅड वसंतराव गावडे,संचालक-माळेगाव सहकारी साखर कारखाना ली शिवनगर.श्री सागर जाधव, संचालक-माळेगाव सहकारी साखर कारखाना ली शिवनगर. श्री शहाजी गावडे, चेअरमन-श्री वाघेश्वर विविध कार्यकारी सहकारी संस्था मळद. श्री तुकाराम गावडे, चेअरमन श्री दत्त विविध कार्यकारी सहकारी संस्था मळद आदी हजर होते, तसेच बाळासाहेब गवारे, बाळासाहेब घोरपडे, सुनील पवार (ग्रामसेवक, मळद) अविनाश गावडे (पोलिस पाटील, मळद), रामचंद्र मदने, अधिकराव देशमुख, आण्णा वाघमारे, रामचंद्र इनामके, सुरेंद्र वरे, दिलीप सुभेदार, जयप्रकाश घाडगे, प्रविण झांबरे, सुनील सुभेदार, नानासो गावडे, मोहन परकाळे, प्रशांत वरे, गणेश मदने, चारूदत्त गावडे, अमोल पवार, भाऊसाहेब पडळकर, विनय शेळके, संतोष झांबरे, संतोष वरे आदी मळद गावातील तसेच मंचर, सातारा, कराड, नाशिक, पुणे व जिल्ह्यातील प्रगतशील सेंद्रिय शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!