जरंडेश्वर चे विस्तारीकरण 140 कोटी मध्ये, तर माळेगावचे विस्तारीकरण व वीज निर्मिती प्रकल्प 180 कोटीत कसे?
अजितदादांनी दिले कारखान्याचे ऑडिट करण्याच्या सुचना
जरंडेश्वर चे विस्तारीकरण 140 कोटी मध्ये, तर माळेगावचे विस्तारीकरण व वीज निर्मिती प्रकल्प 180 कोटीत कसे?
अजितदादांनी दिले कारखान्याचे ऑडिट करण्याच्या सुचना
बारामती वार्तापत्र
गेल्यावर्षी माळेगाव कारखान्याने ज्यादा दर देत परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत बाजी मारली होती. मात्र जरंडेश्वर कारखान्याच्या तुलनेत माळेगाव कारखान्याचे विस्तारीकरण व वीजनिर्मिती प्रकल्प 180 कोटी रुपयांपर्यंत गेले. हा वाढीव खर्च कसा झाला याविषयी कारखान्याचे ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या होत्या. त्याची बैठक आज पार पडली.
कारखान्याचे ,दूध प्रकल्पाचे ,दूषित पाणी नदीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.त्यासाठी यंदा माळेगाव कारखान्याने शून्य प्रदुषण पातळी यंत्रणा बसविल्याने अजितदादांनी समाधान व्यक्त केले. मालेगावचा यंदाचा गळीत हंगाम उत्तम रित्या चालल्याने कारखान्याच्या कारभाराची ऑडिट करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक घेतली.
यावेळी गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साडेचार लाख टन गळित झाले आहे .प्रतिदिन रिकव्हरी 10.51 व 60 कोटी डिस्टलरी चे उत्पन्न निर्मितीचे , वीज प्रकल्पाचे 30 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न कारखान्याला मिळू शकेल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांच्यासह संचालक मंडळाने दिल्याने अजितदादांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
माळेगावचे विस्तारीकरण व्यवस्थित झाले असते तर गेल्या वर्षीची रिकव्हरी घसरली नसती व शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते. त्यावर मार्ग काढण्यासाठी व्हीएसआय चे तज्ञ अधिकारी गळीत हंगामाच्या अगोदर कारखान्यात पाठवून यंत्रसामग्री मधील त्रुटी काढल्याने कारखाना प्रतिदिन साडेआठ हजार मेट्रिक टन गाळप करत आहे. असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.
तसेच शिरवली हद्दीतील काळा ओढा स्वच्छ करण्यासाठी शासनाची मशनरी देण्याचेही त्यांनी सांगितले. माळेगावच्या सभासदांना यंदा मेडिक्लेम पॉलिसी सुरू करून दोन महिन्यात 56 सभासदांनी या योजनाचा लाभ घेतला आहे.
ऊस तोडी चे नियोजनही उत्कृष्ट झाले आहे. 75 टक्के सभासदांचा आडसाली ऊस संपवण्यात यश आले आहे. त्यामुळे सभासदांची गहू हरभरा ही पिके घेण्यात आली आहेत .
यावेळी अजितदादांनी साखर विक्री तसेच इथेनॉल निर्मिती व वीज निर्यात वाढविण्यावर भर द्यावा बगॅसची साठवण व्हावी, मोलासेस स्टोरेज टॅंक उभारणे मोलासेस टाक्यांची व्यवस्था सुरक्षित ठिकाणी करण्याच्या सूचना पवार यांनी कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांना दिले.
यावेळी कारखान्याचे संचालक केशवराव जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी नाना होळकर, अनील तावरे, योगेश जगताप ,नितीन सातव, राजेंद्र चव्हाण ,तानाजी देवकाते ,सागर जाधव ,रवींद्र थोरात ,संगीता कोकरे, संदीप जगताप, रविराज तावरे, रणजीत तावरे , उपस्थित होते