जळोची येथील कोरोना मृत देहा वर नगरपरिषद कर्मचाऱ्या कडून अंत्यसंस्कार.
जळोची येथील कोरोना पॉझिटिव्ह चा अखेर मृत्यू
जळोची येथील कोरोना मृत देहा वर नगरपरिषद कर्मचाऱ्या कडून अंत्यसंस्कार.
जळोची येथील कोरोना पॉझिटिव्ह चा अखेर मृत्यू.
बारामती:वार्ताहर
कोरोना असल्याच्या कारणाने नागरिकाच्या मृत्यू नंतर बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
बारामती मध्ये अशाप्रकारे पीपीई किट परिधान करून एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची दुसरी घटना घडली आहे.
आज बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या चार कर्मचा-यांनी पीपीई किट परिधान करुन संपूर्ण काळजी घेत अमरधाम स्मशानभूमीमध्ये अशा रुग्णांसाठी असलेल्या विशिष्ट बॅगमध्ये मृतदेह ठेवून नंतर अंत्यसंस्कार केले गेले. त्यानंतर जळोची येथील राहत्या घरी सुद्धा फवारणी करून निर्जंतुक करण्यात आले.
या नंतर या चारही कर्मचा-यांना सात दिवसांची रजा देण्यात आली असून त्यांनी घरीच राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
आशा कर्मचारी दैनंदिन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार असल्याचे किरणराज यादव यांनी सांगितले.
दरम्यान नगरपालिकेने हे अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांकडून संमतीपत्रक घेऊन तसेच अशा रुग्णाच्या बाबतीत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन ही प्रक्रीया पार पाडली गेली.
या अंत्यसंस्कारानंतर अमरधाम स्मशानभूमीचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे.
संबंधित चार कर्मचा-यांना सात दिवसानंतर पुन्हा तपासून गरज वाटल्यास आणखी सात दिवसांची रजा दिली जाईल, असेही यादव यांनी स्पष्ट केले.