ज्येष्ठ नेते शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर ‘हे’ कारण
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भातील कारण स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर ‘हे’ कारण
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भातील कारण स्पष्ट केले.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती येथील माळेगाव येथील आप्पासाहेब पवार सभागृहात आज यात्रेचं स्वरूप आलं आहे. दिवाळी भेट कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी झुंबड झाली आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमास अनुपस्थित असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भातील कारण स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या ताफ्यातील दोन चालक आणि इतर तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याने अजितदादांसह इतरांचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्या तपासणीचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. परंतु राज्यभरातून हजारो लोक येणार असल्याने कोणताही धोका पत्करायला नको म्हणून ते येथे उपस्थित राहीले नाहीत असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत येणारं वर्ष सुखसमृद्धीचं जावो अशा सदिच्छा दिल्या. मात्र या कार्यक्रमास यंदा अजित पवार गैरहजर आहेत. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या स्टाफमधील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजतंय.. त्यामुळे कदाचित अजित पवार आले नसल्याचं सांगण्यात येत आहे.
स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या शुभेच्छा स्वीकारत आहेत. वर्षातून एकदा संपूर्ण पवार कुटुंबियांना भेटण्याची संधी उपलब्ध होत असल्यानं कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच सभागृहात गर्दी करत दीपावलीच्या शुभेच्छा देत आहेत. यंदा भेटण्याच्या स्थळात थोडासा बदल करण्यात आला असून पवार कुटुंबिय दिवाळीच्या पाडव्याला गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानाऐवजी लगतच असलेल्या डॉ. आप्पासाहेब पवार सभागृहात लोकांना भेटत आहेत.