जागतिक अन्न दिन निमित्त वर्षभर “स्वच्छ ताट अभियान”
१६ ऑक्टोम्बर जागतिक अन्न दिन निमित्त फोरम चा उपक्रम

जागतिक अन्न दिन निमित्त वर्षभर “स्वच्छ ताट अभियान”
१६ ऑक्टोम्बर जागतिक अन्न दिन निमित्त फोरम चा उपक्रम
बारामती वार्तापत्र
१६ ऑक्टोबर हा ‘जागतिक अन्न दिन, म्हणून जगभरात साजरा केला जातो पण त्याच दिवशी म्हणजे फक्त एक दिवस नाही तर वर्षभर “स्वच्छ ताट अभियान” योजना राबवणे गरजेचे आहे या साठी सर्विस इंजिनियर्स फोरम आणि सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ ताट अभियान” योजनेचा मुख्य संदेश आहे
या मुख पोस्टर चा प्रकाशन समारंभ प्रसंगी इंजि. हेमचंद्र शिंदे , संभाजीराव जगदाळे, शहाजी निंबाळकर,अजित जमदाडे, प्रदीप वाळुंजकर, डॉक्टर संताजी शेळके, हेमचंद्र शिंदे, प्रदीप कुलकर्णी, रवींद्र व राजेंद्र ठोंबरे बंधू तसेच वसंतराव घनवट, दीपक पांढरे, उद्धव मोरे, बबनराव संग्रामपूरकर सर्व संचालक मंडळासह तालुक्यातील अभियंते उपस्थित होते.
मावेल जेवढे पोटात-तेवढेच घ्यावे ताटात” त्यामुळे अन्नाची नासाडी तर थांबेलच, बचतही होईलच आणि त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहील.
जपानमध्ये एक लाख लोकांची शंभरी पार, यामागचं रहस्य काय तर ८० टक्के फक्त पोट भरणे होय.
दरवर्षी जगामध्ये ३० टक्के पण भारतात मात्र ४० टक्के अन्न वाया जाते. भारतात दरवर्षी दर माणसी ५० किलो अन्न वाया जाते आणि भुकेल्यापर्यंत न जाता ते कचऱ्यात जाते. अन्न वाया घालवण्यापूर्वी आपल्या थाळीमध्ये येण्यापूर्वी शेतकरी बांधवांचे त्या मागचे कष्ट लक्षात घ्या. कोणतेही गोष्ट विकत घेतल्यावर किंमत राहते.
कुणाच्या लग्न समारंभात अन्न वाया घालवू नये असेही फोरम च्या वतीने सांगण्यात आले.
चौकट:
पोस्टरची छपाई आणि पोस्टल चार्जेस खर्च रुपये दीडशे असला तरी आपणास मोफत पाठवण्यात येईल पण,पण, पण “फुकट ची किंमत कळत नाही” म्हणून आपणाकडून फक्त एक कप साध्या चहाची अपेक्षा म्हणजेच रुपये फक्त अकरा भरून पोस्टर मागवा हेमचंद्र शिंदे.