जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित “ती एक,रूप अनेक” कार्यक्रम उत्साहात साजरा
▫️कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद▫️

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित “ती एक,रूप अनेक” कार्यक्रम उत्साहात साजरा
▫️कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद▫️
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते सागर पवार मित्र परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘ ती एक, रूपं अनेक’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील कार्यक्रमात इंदापूर शहरातील विविध क्षेत्रातील आपल्या जिद्द व चिकाटीने यशस्वी झालेल्या युवती व महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिलांच्या हक्क अधिकारांसाठी लढणाऱ्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशिल असणाऱ्या ॲड.प्रतिमा अभिजीत भरणे आणि सेलिब्रिटी आर्टिस्ट वैशाली उमेश कुऱ्हाडे यांना याप्रसंगी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ॲड.प्रतिमा भरणे यांनी महिलांच्या विविध समस्यांवरती भाष्य करीत त्या समस्या कशा सोडवाव्यात यावरही महिलांना मार्गदर्शन केले.आयुष्य खूप सुंदर आहे, ते अधिक सुंदर बनवा, महिलांनी स्वतःसाठी रोज एक तास द्या, हेल्दी जीवन जगा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी शोभा मधुकर भरणे, तालुका राष्ट्रवादी महिलाअध्यक्षा छाया पडसळकर, स्मिता पवार, अर्चना शेवाळे, माजी नगराध्यक्षा अलका ताटे, माया विंचू,सुवर्णा गाढवे,सविता पवार यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमा इंगोले,सारिका जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.पर्यवेक्षक म्हणून डॉ.अश्विनी ठोंबरे व डॉ.अनुराधा धापटे यांनी काम पाहिलं, सुत्रसंचालन दिपा राऊत यांनी केलं तर आभार सागर पवार यांनी मानले.
“ती एक,रूप अनेक” कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या वेशभुषा स्पर्धेत सुमेधा दोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर आकांक्षा शहा यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच सासु- सुन जोडी स्पर्धेत सौ.घनवट यांचा प्रथम तर अनुराधा धापटे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सुपर मायलेक जोडी स्पर्धेत गीता कोथमिरे प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर सारिका जगताप यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.तसेच यावेळी घेण्यात आलेल्या लकी ड्रॉ स्पर्धेत रोहिणी सुहास जगताप ‘लकी’ ठरल्या त्यांना एलईडी टीव्ही बक्षीस म्हणून देण्यात आला.