स्थानिक

जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

योग केल्याने आपले शरीर निरोगी राहते.

जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

योग केल्याने आपले शरीर निरोगी राहते.

बारामती वार्तापत्र

जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव असून जो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याला प्रोत्साहन देतो, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.

जागतिक योग दिनानिमित्त बारामती तालुका प्रशासन, जिल्हा क्रीडा संकुल व योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, कबड्डी मार्गदर्शक दादासाहेब आव्हाड, खेळाडू, योगसाधक, नागरिक उपस्थित होते.

श्री. नावडकर म्हणाले, दरवर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यामुळे नागरिकांना योगाचे महत्त्व समजते आणि ते आपल्या जीवनाचा भाग बनवतात. योग केल्याने आपले शरीर निरोगी राहते. योगामध्ये वेगवेगळ्या शरीराच्या हालचाली (आसने) आणि श्वास घेण्याचे व्यायाम (प्राणायाम) असतात. यामुळे आपली हाडे आणि स्नायू मजबूत होतात. मन शांत राहण्यासोबतच एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी योगा केल्यास त्यांचा अभ्यास आणि खेळात लक्ष चांगले लागते, असेही श्री.नावडकर म्हणाले.

यावेळी योगाभ्यासाची विविध प्रात्यक्षिके करण्यात आली.

Related Articles

Back to top button