‘जागा द्या आणि जागे रहा’ भाडेकरूंच्या बहाण्याने लुटणारे पती-पत्नी अखेर जेरबंद 19 जिल्ह्यात घरमालकांना लावला चुना
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहिती

‘जागा द्या आणि जागे रहा’ भाडेकरूंच्या बहाण्याने लुटणारे पती-पत्नी अखेर जेरबंद 19 जिल्ह्यात घरमालकांना लावला चुना
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहिती
बारामती वार्तापत्र
राहण्यासाठी भाड्याने घर पाहिजे म्हणून वास्तव्य करायचे आणि थोड्या दिवसात त्या घरातच हात साफ करायचा अशा घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्या मात्र पोलिसांनी त्यांचे हात लांबवताच त्यांचा डाव फसला
बारामती तालुक्यातील सांगवी येथे राहणारे राहुल सदाशिव तावरे यांची तीन लाख 36 हजार रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरीस गेले होते या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी या गुन्ह्यासाठी पथक तयार करण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सांगवी येथील घरफोडी मधील आरोपी हे सध्या नागपूर येथे असून ते भाडोत्री घरात राहत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथे सापळा रचून नवनीत मधुकर नाईक वय 40 ,,प्रिया नवनीत नाईक वय 36 दोघे राहणार रूम नंबर दोन विजय निवास रेडी स्थळ शिवाजी नगर भांडुप पश्चिम मुंबई या पती-पत्नी असलेल्या जोडप्याला अटक केली.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या जोडप्याने भोर लोणावळा कोपरगाव पोयनाड नवी मुंबई लोणंद अमरावती कोल्हापूर ठाणे रत्नागिरी मालेगाव वाशिम सांगली जालना वाशी नवी मुंबई बेंगलोर अहमदनगर अशा वेगवेगळ्या 19 जिल्ह्यांमध्ये भाडोत्री राहण्याच्या बहाण्याने घरमालकाच्या घरी चोरी केली होती. मात्र पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे सहाय्यक फौजदार दत्तात्रय ड्रिंकर पोलीस हवालदार रविराज कोकरे अनिल काळे उमाकांत कुंजीर जनार्दन शेळके ज्योती कांबळे मोहम्मद अंजीर मोमीन विजय कांचन अजित भुजबळ अभिजीत एकशिंगे मंगेश थिगळे धीरज जाधव यांनी केली