जेव्हा शेताच्या बांधावरूनच सुरू होते शहराध्यक्षांची रिपोर्टिंग…
राज्यमंत्री भल्यापहाटे शेताच्या बांधावर

जेव्हा शेताच्या बांधावरूनच सुरू होते शहराध्यक्षांची रिपोर्टिंग...
राज्यमंत्री भल्यापहाटे शेताच्या बांधावर
इंदापूर : प्रतिनिधी
राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडी सरकारने त्यांवर टाकलेली जबाबदारी चोखपणे बजवताना अवघा महाराष्ट्र बघत आहेत.त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.असे असताना इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे व इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे हे त्यांना भेटण्यासाठी सुर्योदय होणाऱ्यापूर्वीच गेले असता चक्क राज्यमंत्री दत्तात्रय भरणेच शेतामध्ये पाहणी करत असताना भल्या पहाटेच्या सुमारास दिसले आणि काय? शहराध्यक्षांनी लागलीच काढला मोबाईल आणि सुरू केली रिपोर्टिंग..नेता असावा तर असा असे म्हणत त्यांनी राज्यमंत्र्यापुढेच स्तुतीसुमने उधळली.
आपल्या कामात एवढे व्यस्त असून देखील शेतीच्या कामासाठी भल्या पहाटे उठून शेतामध्ये काय चाललयं काय नाही हे पाहणाऱ्या नेत्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि शेतीशी असणारी नाळ कधीच तुटली नाही पाहिजे.हे मामांकडून शिकण्याजोगे आहे म्हणत ढवळे यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्री भरणेंकडे पहाताना नेता असावा तर असा असे म्हणत स्तुती केली.
सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आपल्या दिलखुलास अंदाजाने सर्वत्र परिचित आहेत.त्यांच्यावर राज्यमंत्री पदासह सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी पडल्यापासून ते आपल्या कामात अत्यंत व्यस्त आहेत.पण सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या या नेत्याची शेतीविषयी असणारी आपुलकी आणि नाळ तशीच जोडली गेलेली असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.