राजकीय

जादूटोणा, आर्थिक व्यवहार अन् अजितदादांच्या अपघाताशी भोंदू खरातचा संबंध?रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा

जादूटोणा, आर्थिक व्यवहार अन् अजितदादांच्या अपघाताशी भोंदू खरातचा संबंध?रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा

बारामती वार्तापत्र 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सकाळी एक खळबळजनक ट्विट केले आहे. अजितदादांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा काही संबंध आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.

आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे.

अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Back to top button