जामतारा वेबसिरीज पाहून प्रेरीत होवून अमेरीकेतील नागरीकांची कॉल सेन्टर वरून ऑनलाईन फसवणुक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी व बंगल्याचे आवारात दारासमोर गांझाची शेती करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
१५ आरोपीसह सुमारे १५,८४०००/-(पंधरा लाख चौरेऐंशी हजार )रु मुद्देमाल जप्त

जामतारा वेबसिरीज पाहून प्रेरीत होवून अमेरीकेतील नागरीकांची कॉल सेन्टर वरून ऑनलाईन फसवणुक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी व बंगल्याचे आवारात दारासमोर गांझाची शेती करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
१५ आरोपीसह सुमारे १५,८४०००/-(पंधरा लाख चौरेऐंशी हजार )रु मुद्देमाल जप्त
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
दिनांक 13/05/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट, पो.स.ई.श्री.रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, महिला पो.स.ई.माधवी देशमुख, सहा.फौज. विजय पाटील, दत्तात्रय जगताप, पो.हवा.सुनिल जावळे, सुर्यकांत वाणी, प्रमोद नवले, मुकुंद अयाचित, विदयाधर निचीत, दत्तात्रय तांबे, पो.ना.सागर चंद्रशेखर, गुरू जाधव, पो.काॅ.बाळासाहेब खडके, पो.काॅ.प्रसन्न घाडगे, अक्षय नवले अक्षय जावळे, दगडु विरकर यांचे पथक मा.पोलीस अधीक्षक डाॅ.श्री.अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विवके पाटील, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. नवनीत काॅवत यांचे मार्गदर्शनाखाली पेट्रोलींग करीत असताना पो.नि.श्री. घनवट यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, श्री.कौशल जगदीश राजपुरोहीत यांचे मालकीचा असणारा मौजे वाकसाई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लाॅट नंबर 15 मध्ये असणारे सुरावत विल्ला नावाचे बंगल्यामध्ये इसम नामे – विनोद सुभाशचंद्र राय रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी, एम 19, विरार वेस्ट,ठाणे हा व त्याचे सहकारी हे काॅम्पुटर व मोबाईल साॅफटवेअरवरून व्हाॅईसमेल पाठवून मलमइमंउ व गजमद या साॅफ्टवेअरचे माध्यमातुन इंटरनेटचा वापर करून अमेरिकेतील लोकांची फसवणुक करून त्यातुन बेकायदेशिर रित्या हवालाकरवी पैसे जमा करीत आहेत अशी माहीती मिळाल्याने लागलीच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जावून रात्रीचेवेळी छापा टाकला असता
इसम नामे 1) अभिनव दिपक कुमार, रा. कन्हेैया भैरव रेसीडेन्सी, 1413, कनकिया, मीरा रोड, ठाणे, 2) निनाद नंदलाल देवळेकर, रा. बिल्डींग नं. 9, शिवसंुदर काॅम्प्लेक्स, बदलापूर इस्ट, ठाणे, मुळगाव गुहागर, रत्नागिरी, जि. रत्नागिरी, 3) राकेश अरूण झा, रा. बी- 302, इमरल्ड हाईटस्, प्लाॅट नं. 1417, मानसरोवर, नवी मुंबई 4) शंतनू शाम छारी, , रा. फलॅट नं. 203, बी-2, गौरवसिटी, कनाकिया, मिरा रोड, मुंबई, 5) दीप प्रिन्स चक्रवर्ती, , रा. 403, साई सिटी काॅम्प्लेक्स, बस डेपो जवळ, ग्रीन व्हयु, नालासोपारा वेस्ट, ठाणे, 6) निलेष वेल्जी पटेल, , रा. फलॅट नं. 511, सी विंग, सुर्याकुमार सोसायटी, खुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई, 7) विनोद सुभाषचंद्र राय, रा. फलॅट नं. 104, एम-19 विंग, इव्हरशाईन ग्लोबल सिटी, विरार वेस्ट, ठाणे, 8) शाहीद शोएब खान, , रा. 301, एफ. विंग, शांतिनिकेतन काॅम्प्लेक्स, एस.के. स्टोन, मिरा भाईंदर, ठाणे, 9) इम्तेखाब निजामुद्दीन शेख, , रा.रूम नं. 5, गेट नं. 7, अजिमनगर, मालवणी, मालाड, मुंबई 95, 10) गौरव देवेंद्र वर्मा, रा.फलॅट नं. डी-2, कल्पतरू सोसायटी, बोरीवली, मुंबई, 11) बाबु राजू सिंग, रा. फलॅट नं. 405, निरव पार्क बिल्डींग, भारती पार्क, मॅग्नाॅल्डचे समोर, मिरा रोड, ईस्ट, ठाणे, 12) विनायक धनराज उचेडर, रा. ठाकूर गाव, सिंग इस्टेट, विनायक सोसायटी, कांदीवली इस्ट, मुंबई, 13) अभिषेक संजय सिंग, रा. ए विंग 102, र्साइ विकास अपार्टमेंट, साईबाबा नगर, मीरा रोड, ठाणे इस्ट, 14) मोहम्मद झमा अख्तरहुसेन मिर्र्झाो, रा. डी-001, चंदे्रश छाया लोढा काॅम्प्लेक्स, लोढा रोड, मिरा रोड इस्ट, ठाणे, 15) शैलेष संजय उपादयाय, रा. खोली नं. 2, कुरार गाव, मालाड इस्ट, मुंबई यांनी जुलै 2020 ते आजपर्यत एकत्रीत संगनमताने मौजे वाकसाई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लाॅट नंबर 15 मध्ये असणारे सुरावत विल्ला नावाचे बंगल्यामध्ये इंटरनेट व संगणक तसेच मोबाईल फोन व साॅफ्टवेअरचा उपयोग करून युनायटेट स्टेटस् ऑफ अमेरिका येथील नागरिकांचा मोबाईल फोन नंबर, नांव व इतर माहिती बेकायदेशिर रित्या प्राप्त करून संकलित करून त्या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरीकांना तुमचेवर कायदेशिर कारवाई केली जाईल असा खोटा व्हाईस मेल पाठवुन त्यांना घाबरवुन गिफ्टस् कुपन आरोपीना देण्यास भाग पाडले व स्वतःची आर्थीक प्राप्ती करून घेवून फिशीग केली आहे तसेच वरील नमुद आरोपी श्री. कौशल जगदीश राजपुरोहीत रा. लोणावळा याचे मालकीचा व सदया विनोद सुभाश राय रा. एव्हरशाईन ग्लोबल सिटी, एम 12 विरार वेस्ट ठाणे याचे ताब्यात असणारा सुरावत विल्ला नावाचे बंगल्याचे आवारात बेकायदा बिगर परवाना 430 ग्रॅम वजनाची कि.रू. 6000 किंमतीची सात गांज्याचे झाडाची स्वतःचे आर्थीक फायदयाकरिता लागवड केली. म्हणुन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पो.हवा.सुर्यकांत मारूती वाणी, नेम. स्था.गु.षा., पुणे ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि.क. 419, सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन 2000 चे कलम 66(डी), 66,75 प्रमाणे सह एन.डी.पी.एस. 1985 चे कलम 8(क),20(ब)(पप),(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयात एकुण 6 लॅपटाॅप तसेच 5 डेस्कटाॅप,15 मोबाईल फोन,2 चार चाकी वाहने(टाटा nexon व ह्युंदाई verna कार), एक दोन चाकी वाहन ( tvs ज्युपिटर) व इतर साहित्य असा एकुण कि.रू. 15,84,000 रू. किंमतीचा माल जप्त करणेत आलेला आहे.
या गुन्ह्यात सहा लॅपटॉप , 21 डेस्कटॉप, पंधरा मोबाईल फोन, दोन – चार चाकी वाहने, एक- दोन चाकी वाहन व इतर साहित्य असा मिळून 15 लाख 84 हजार रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.