जालनाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल…..
बारामती पोलिसांकडून भिगवण पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल......

जालनाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल…..
बारामती पोलिसांकडून भिगवण पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल…….
तपासकामी गुन्हा जालना पोलीस दलाकडे केला वर्ग
बारामती वार्तापत्र
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अर्जुन खोतकर यांनी एका समुदायाच्या विरोधामध्ये वक्तव्य केले होते. यामुळे बारामतीमध्ये अर्जुन खोतकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. त्यानंतर अखेर भिगवण पोलीस ठाण्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्याविरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. खाटीक समाजाबाबत आमदार अर्जुन खोतकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे खाटीक समाजाकडून आक्रमक भूमिका घेतली जात होती. बारामती येथील खाटीक समाजाचे कार्यकर्ते करण सुनील इंगुले यांनी याबाबतची फिर्याद भिगवण पोलिस ठाण्यात दिली. त्या फिर्यादीवरून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात इंदापूर येथील भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ई-पेपर
वेब स्टोरीज
फोटो
विडियो









