जावेद अख्तर यांच्याविरुध्द बारामतीचे अँड. भार्गव सुधीर पाटसकर यांनी अंमली पदार्थ विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
त्या बाबतचे पुरावेही पाटसकर यांनी या तक्रारीसोबत दिलेले आहेत.
जावेद अख्तर यांच्याविरुध्द बारामतीचे अँड. भार्गव सुधीर पाटसकर यांनी अंमली पदार्थ विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
त्या बाबतचे पुरावेही पाटसकर यांनी या तक्रारीसोबत दिलेले आहेत.
बारामती वार्तापत्र
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्वच अभिनेत्रींनी ड्रग्जसंदर्भात चॅट केल्याची कबुली एनसीबीसमोर दिली आहे. त्यांचे मोबाईलही एनसीबीने जप्त केले आहेत.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी गांजा, चरस यांचे सेवन करणे हा काही गुन्हा नाही, अशा स्वरुपाचे वक्तव्य केल होतं.
एनडीपीएस कायद्यान्वये गांजा, चरस यांचे सेवन करणे कलम 27 नुसार अपराध आहे. अशा चुकीच्या वक्तव्यांमुळे अख्तर यांच्यासारख्या एका दिग्गजाने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे, एक प्रकारे गांजा व चरस यांचे सेवन करण्यास प्रवृत्त करणारे त्यांचे विधान असून या बाबत त्यांच्यावर कारवाईची मागणी अँड. पाटसकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
सुशांतसिंह राजपूत यांची मैत्रिण रिया चक्रवर्ती प्रकरणात या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अख्तर यांनी हे वक्तव्य केले आहे. त्या बाबतचे पुरावेही पाटसकर यांनी या तक्रारीसोबत दिलेले आहेत. सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी ड्रग्ज प्रकरणात अडचणीत आले असून चौकशीला त्यांना सामोरे जावे लागते आहे.