जिजाऊ करिअर सेंटरच्या अभ्यासिकेचे उद्घाटन
मराठा सेवा संघाचा ‘ स्तुत्य ‘ उपक्रम
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका ‘मराठा सेवा संघ ‘ संचलित जिजाऊ करिअर सेंटरच्या वतीने अभ्यासिकेची सुरुवात झाली. बारामती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड यांचे हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव तुपे व जिजाऊ भवनचे विश्वस्त उपस्थित होते. अभ्यासिकेला लागणारी पुस्तके व विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य, खुर्ची,,,अविनाश लगड व त्यांचे सहकारी यांनी दिली आहे.
सुधीर शिंदे, अजित उलघडे यांनी कपाट भेट दिली. मनोज पोतेकर यांनी बेंच व अॅड वायकर व त्यांचे मित्र परिवाराने 10 संगणक दिले. आहेत. स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेतून विद्यार्थ्यांना यशस्वी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व इतर सुविधा पुरवली जाणार आहे. सामान्य विदयार्थी प्रशासकिय अधीकारी बनन्याचे स्वप्न बघत असतो ते स्वप्न या अभ्यासिकेच्या माध्यमातुन पुर्ण होईल
बारामती व परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासासाठी पुण्याला जावे लागत होते. मात्र आता बारामतीमध्ये हि सोय उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी जिजाऊ भवन भिगवण रोड येथे नावनोंदणी करुन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी या प्रकल्पाची जबाबदारी असणारे प्रमोद शिंदे, सुधिर शिंदे, अजित उलघडे, मनोज पोतेकर, एड. श्रीनिवास वायकर, सचिन सावंत यांच्यासह संस्थेचे विश्वस्त व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.