स्थानिक

जिद्द चिकाटी च्या जोरावर उद्योग क्षेत्रात महिलांना यश शक्य: सविता माने

कृषी कन्येशी उद्योग क्षेत्रात उंच भरारी व अनेक ग्रामीण महिलांना रोजगार निर्मिती.....

जिद्द चिकाटी च्या जोरावर उद्योग क्षेत्रात महिलांना यश शक्य: सविता माने

कृषी कन्येशी उद्योग क्षेत्रात उंच भरारी व अनेक ग्रामीण महिलांना रोजगार निर्मिती…..

बारामती वार्तापत्र 

व्यवसाय करताना गुणवत्ता व दर्जा दिला पाहिजे,कष्ट करण्याची तयारी पाहिजे व न लाजता, कोणताही न्यूडगंड न बाळगता जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर ग्रामीण भागातील महिलांना यश शक्य असल्याचे प्रतिपादन अर्शिती
मसाला उद्योग समूह च्या चेअरमन सविता शंकर माने यांनी सांगितले.
बारामती मधील महिला उद्योजकांच्या वतीने आयोजित ‘उद्योजिकेची यशोगाथा’ या कार्यक्रमात सविता माने बोलत होत्या.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ च्या अध्यक्षा अर्चना सातव व ज्योती जाधव, ऍड सुप्रिया बर्गे,ऍड प्रिया काटे, ऍड विणा फडतरे, मनीषा शिंदे, दीपाली सावंत आदी मान्यवर व उद्योजक महिला उपस्तीत होत्या.
बारामती परिसरात व राज्यात व्यवसाय वाढवत असताना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
माळशिरस तालुक्यातील पिरळ ,दहिगाव हे मूळ गाव एकत्र कुटुंब व्यवसाय शेती.

घरातील महिला डोक्यावर पदर आणि ऊबंऱ्यांच्या आत पाहिजे असा नियम असताना सुद्धा स्वता:हाचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा हि जिद्द मनात बाळगुन होत्या.मुल लहान असल्याने घराबाहेर पडणे ही शक्य नव्हते.त्यावेळी अनेक गोष्टी शिकुन घेतल्या बचत गटाची स्थापना केली.मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.

एका छोट्याशा गाळ्यात एक मिर्ची काडंप मशिन घेऊन स्वताहाच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला.अनेक अडचणी आल्या विरोध झाला, घरातील बायकांनी चुल आणि मुल व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही.असं ही सांगण्यात आले..पण ज्यावेळी गावातील चार लोक घरात येतात काही गोष्टी घरात नसतानाही घरातील स्त्री कशी ॲडजेस करते ते तीलाच माहित असते मुलाचे शिक्षण उच्च व्याहवे व अनेक महिलांना रोजगार मिळावा हा उद्देश ठेऊन
एक मशीन मिर्ची काडंप (डंका)खरेदी करताना ही भांडवल.. दागिने गहाण ठेवून बचत गटाची जमा रक्कम काढुन भांडवल उभा केले . सुरुवातीला दिवसाचे फार कमी रक्कम मिळे त्यांच्या मेहनतीने आणि जिद्दीने मसाले तयार करून मार्केटिंग त्या
स्वता:हा करु लागल्या प्रदर्शन ला जावुन लागल्या.
मसाल्याची अस्सल चव सर्वोत्तम क्वालेटी
आणि माफक दर आणि बोलण्याची कला यामुळे त्यांच्या मसाल्यांचा प्रचंड मागणी वाढु लागली. गावातील गरजु २० ते ३० महिलांना कामाला घेतले सर्व प्रकारचे लोंनचे ,पापड हळद पीठ असा व्यवसाय वाढवला , मशीन वाढत गेल्या महिला कामगार वाढत गेल्या पती आणि सासुबाईंची मुलांची साथ मिळाली.आणि पंखात आणखी बळ आले हा व्यवसाय आणखी मोठा करावा यासाठी प्रयत्न करु लागल्या.. एका मशिनने केलेली सुरूवात आता अकरा मशिन झाल्या.बारामती येथे अर्शिती उद्योग समूह सुरू केला.
बारामती मधील अनेक कंपन्यांना मसाला ,आटा,पोहच केला जातो..अनेक गरजु महिलांच्या हाताला काम मिळाले.. महिलांच्या अडचणीच्या काळांत त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात व्यवसाय वाढवण्यासाठी ताईंनी रात्रीचा दिवस केला..अनेकांनी नावे ठेवली होती पण दाखवुन दिले सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळुन महिला व्यवसाय हि उत्तम रित्या करु शकते.
*मसाला व्यवसायावर मुलाचे उच्च शिक्षण*
दोन मुलींना उच्च शिक्षण दिले त्या चांगल्या पोस्ट वर काम करतात मुलगा परदेशात शिक्षणासाठी पाठवला इंग्लंड येथे एम एस करुन पीएचडी करत आहे.
बारामती येथे स्वताहाचे घर घेतलें गावातील शेतीत सुधारणा,पाण्याची सोय केली.शेतीही त्या उत्तम प्रकारे करतात.आट्यासाठी लागणारे धान्य शेतात पिकवतात
ग्रामीण महिला रोजगार महत्वाचा
अनेक महिला शहराकडे धाव घेतात पण ग्रामीण भागातील महिला ना घर बसल्या रोजगार देताना त्यांच्या कडून वस्तू बनवून घेत असल्याने वेळ व पैसा ची बचत होते व ग्रामीण भागातील महिला समाधानी होतात.

उपस्तितांचे आभार अर्चना सातव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram