जिरायत भागात कोविड केअर सेंटरची उभारणी करणे काळाची गरज:-मुनिर तांबोळी.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केले मत व्यक्त..
जिरायत भागात कोविड केअर सेंटरची उभारणी करणे काळाची गरज:-मुनिर तांबोळी.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केले मत व्यक्त..
बारामती वार्तापत्र
कोरोना महामारीमुळे आणि दिवसेंदिवस वाढतच असणाऱ्या रुग्ण संख्येमुळे येणारा काळा भयंकर आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड होणार असून त्यासाठी बारामती तालुक्यातील जिरायती भागात कोविड केअर सेंटर लोणी भापकर गावामध्ये उभारण्यात यावे ही काळाची गरज आहे.असे मत अखिल भारतीय मानवी हक्क संघटना बारामती शाखा अध्यक्ष मुनिर तांबोळी यांनी मांडले आहे.
या सेंटर साठी प्राथमिक शाळा ताब्यात घेऊन तिथे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आपल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर यांच्या देखरेखीखाली विलगीकरन करून गावातच उपचार करता येईल.व गावातील रुग्ण गावातील कोविड सेंटर मध्ये बरे होतील.हे सेंटर उभारण्यासाठी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था,स्थानिक खाजगी डॉक्टर यांच्या मदतीने सहज शक्य आहे.यासाठी सर्वांनी पुढे येऊन काम करण्याची गरज असल्याचे मत देखील तांबोळी यांनी व्यक्त केले आहे.