पुणे

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार बारामती तालुक्यात नवीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत

कोरोना विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोग्याच्या प्रतिबंध व नियंत्रण बाबतचे आदेश

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार बारामती तालुक्यात नवीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत

कोरोना विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोग्याच्या प्रतिबंध व नियंत्रण बाबतचे आदेश

बारामती तालुक्यातील कोविड-१९ चा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज दि.३ पासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहणार

ज्याअर्थी सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडोल पत्र दिनांक १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड -१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजनाकरणे आवश्यक आहे.

त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे आपती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती विरुध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

१. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत दि. ०३/०४/२०२१ पासून सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर आदेशाचा भंग करणा-या व्यक्तीस रक्कम रु. १०००/- (प्रति व्यक्ती) याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

२. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीत दि. ०३/०४/२०२१ पासून सायंकाळी ०६.०० ते सकाळी ०६.०० या संचार ( संचारबंदी) करणेस प्रतिबंध असेल. मात्र यामधून जीवनाश्यक वस्तूंचा ( दुध, भाजीपाला, फळे इतर) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना/व्यक्तींना कोवीड लसीकरणासाठी जाणा-या नागरीकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचा-यांना व त्यांनी ने-आण करणा-या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात येत आहे.

३. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपरिषद व छावणी परिषद हद्दीतील
सर्व हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमा हॉल,( Single Screen and Multiplex) नाट्यगृह, स्विमिंगपूल, स्पा, व्यायामशाळा (जिम) व इ. आस्थापना दि.०३/४/२०२१ पासून ७ दिवस/ पुढिल आदेशापर्यंत संपुर्णपणे बंद राहतील. तथापी, हॉटेलमार्फत पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील.

सदर आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग कायदा, १८९७ आणि या संदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,याची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!