“सहस्त्रचंद्रदर्शन” सोहळ्यानिमित्त संस्थेमध्ये सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी तीन दिवसीय वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन
दंत आरोग्याच्या समस्यांचे विश्लेषण करून उपाय व आधुनिक उपचार पद्धती स्पष्ट केल्या

“सहस्त्रचंद्रदर्शन” सोहळ्यानिमित्त संस्थेमध्ये सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी तीन दिवसीय वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन
दंत आरोग्याच्या समस्यांचे विश्लेषण करून उपाय व आधुनिक उपचार पद्धती स्पष्ट केल्या
बारामती वार्तापत्र
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे सन्मा.अध्यक्ष श्री. जवाहर शाह (वाघोलीकर) यांच्या केले होते असे संस्थेचे सन्मा. सचिव.श्री मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी नमूद केले.
तीन दिवसीय वैद्यकीय चर्चा सत्रा च्या उद्घाटनप्रसंगी दि. 15 जुलै रोजी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. हर्षवर्धन व्होरा (एम.डी. चेस्ट फिजिशियन) यांनी “जागृतीपासून कृतीकडे : आपल्या आरोग्याचे नियंत्रण स्वतः घ्या” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. सत्यजित शांतिलाल शहा (पंदारकर) –सदस्य, नियामक मंडळ, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी व चेअरमन, ज्यु. कॉलेज, तु.च महाविद्यालय, बारामती उपस्थित होते.
चर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी दि. 16 जुलै रोजी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सौरभ दोशी (BDS, MDS) – Cosmetic Dentist & Micro-Root Canal Treatment Specialist यांनी दंत आरोग्य समस्या व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी दंत आरोग्याच्या समस्यांचे विश्लेषण करून उपाय व आधुनिक उपचार पद्धती स्पष्ट केल्या. तर या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. अड. बकुल रमेश दोशी (सदस्य, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामती) आणि डॉ. हर्षवर्धन व्होरा (सदस्य, नियामक मंडळ) उपस्थित होते.
चर्चासत्राच्या तिसऱ्या दिवशी दि.17 जुलै रोजी महिलांसाठी आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जे. जे शहा (MBBS,DGO,MD) आणि गितांजली अंबर्डेकर (MBBS, MS– अॅडव्हान्स ऑनकोप्लास्टिक सर्जन) यांनी जागरूकता हि शक्ती – महिलांमध्ये होणारे रोग व कर्करोग समजून घेणे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सौ. संगीता शाह (वाघोलीकर) आणि सौ. क्षमा शाह (वाघोलीकर) उपस्थित होत्या.
तिन्ही दिवसाच्या प्रमुख वक्त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या विविध प्रश्नांचे समाधानकारक शंका निरसन केले व श्रोत्यांनी सदर उपक्रमास मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन अशा प्रकारचे विविध उपक्रम संस्थेमध्ये वेळोवेळी राबवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
उद्घाटन प्रसंगी चर्चासत्राचे प्रास्ताविक फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री. दर्शन शहा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. अश्विनी तोडकरी यांनी केले, तर चर्चासत्र च्या तिसऱ्या दिवशी प्राध्यापिका सौ. सुकन्या परिचारक यांनी आभार प्रदर्शन केले.
वैद्यकीय चर्चासत्राच्या आयोजनासाठी डॉ. अविनाश जगताप. प्राचार्य, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, डॉ. धनंजय बागुल, डायरेक्टर अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, श्रीमती. प्रणाली वडेर, प्राचार्या, अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल व डॉ. श्री दर्शन शहा, प्राचार्य, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी बारामती यांनी विशेष परिश्रम घेतले.