जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत अनेकान्त स्कूलचे घवघवीत यश…..
तृतीय क्रमांक प्राप्त
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठान, इंदापूर येथे जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. १४ वर्षे वयोगट मुले यांच्या जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत पुणे जिल्हा ग्रामीणमधून अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुलांच्या संघाने हॅण्डबॉल स्पर्धेत सहभाग घेत उत्तम कामगिरी केली.
या मुलांच्या संघातून कर्णधार विघ्नेश झगडे, कृष्णा सपकाळ, पार्थ काटकर, चैतन्य बनकर, श्रीराज जगदाळे, संस्कार बंड, अर्णव देशमुख, सार्थक गार्डी,विराज वायसे, शिव ढेंबरे या खेळाडूंनी उत्तम लढत दिली. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक अनुराग देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
शाळा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रवदन शहा मुंबईकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती व स्कूलच्या प्राचार्या यांनी शुभेच्छा दिल्या.