स्थानिक

ज्ञानसागरच्या श्रेया हिची शासकीय राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

14 वर्ष वयोगटात तीन ब्रास पदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ज्ञानसागरच्या श्रेया हिची शासकीय राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

14 वर्ष वयोगटात तीन ब्रास पदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रिडा परिषद, पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, पुणे आयोजित विभागस्तरीय स्केटींग क्रिडा स्पर्धा दि.16 व 17 ऑक्टोबर रोजी मनपा स्केटिंग रिंग, विमाननगर,पुणे येथे पार पडल्या.

बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलमधील 4 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये कु.श्रेया रंजीत गोरे हिने 14 वर्ष वयोगटात तीन ब्रास पदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

या विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक ललित लोखंडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सागर मानसिंगराव आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे , सचिव मानसिंग आटोळे, संचालिका पल्लवी सांगळे, दिपक सांगळे, दिपक बिबे सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक सुधीर सोनवणे ,दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप व सर्व शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button