जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी वधूची करवली बनून विवाह समारंभाचा आनंद केला द्विगुणित
वधू-वरांना वैवाहिक जीवनासाठी दिल्या शुभेच्छा
जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी वधूची करवली बनून विवाह समारंभाचा आनंद केला द्विगुणित
वधू-वरांना वैवाहिक जीवनासाठी दिल्या शुभेच्छा
बारामती वार्तापत्र
जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी( बावडा) येथील चि. हनुमंत अंकुश निकम व चि.सौ.कां. दिव्या केशव जाधव यांच्या विवाहास उपस्थित राहून वधू दिव्यास बाशिंग बांधून करवलीची जबाबदारी पार पाडून निकम व जाधव परिवाराच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला. सामाजिक बांधिलकीतून कुटुंबाप्रमाणे कार्याची भूमिका अंकिता पाटील यांच्याकडून झाल्याने उपस्थित नागरिकामध्ये सुखदायक वातावरण यावेळी तयार झाले होते.
अंकिता पाटील म्हणाल्या की,’ लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण सुखद क्षण, दोन जीवाचे मिलन आणि नवीन आयुष्याची सुरूवात आहे.
विवाह संपन्न झाल्यानंतर वधू-वरांना पुढील वैवाहिक जीवनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
एका सर्वसामान्य कुटुंबातील विवाह प्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा युवारत्न अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी सर्वसामान्य मुलीप्रमाणे सहभागी होत वधू दिव्या ही आपली एक मैत्रीण आहे या भूमिकेतून कौटुंबिक समारंभातील आनंद द्विगुणित केला.