शैक्षणिक
जिल्हा परिषद 1 हजार 334 शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा
किमान दीड वर्षाच्या खंडानंतर या शाळा सुरु होणार
जिल्हा परिषद 1 हजार 334 शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा
किमान दीड वर्षाच्या खंडानंतर या शाळा सुरु होणार
पुणे; बारामती वार्तापत्र
पुणे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या 1 हजार 334 शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शाळांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांनी नियमित शाळा सुरु करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे किमान दीड वर्षाच्या खंडानंतर या शाळा सुरु होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत शालेय व्यवस्थापन समित्यांना अधिकार दिले आहेत. हे अधिकार देण्यापूर्वी किती गावे, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समित्या गावांतील प्राथमिक शाळा नियमितपणे सुरु करण्यास तयार आहेत, याचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते.