स्थानिक

जिल्ह्यातील 11 लाख 61 हजार बालकांना जॅपनीज एन्सेफलायटीस लस देण्यात येणार

लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

जिल्ह्यातील 11 लाख 61 हजार बालकांना जॅपनीज एन्सेफलायटीस लस देण्यात येणार

लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे, प्रतिनिधि

राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील 1 वर्ष ते 15 वर्षाखालील बालकांना मार्च 2025 पासून जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 11 लाख 61 हजार 331 इतक्या बालकांना लस दिली जाणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. डूडी म्हणाले, जॅपनीज एन्सेफलायटीस हा आजार 15 वर्षाखालील बालकांमध्ये आढळून येतो. आशिया खंडात ॲक्यूट एन्सेफलायटीस सिंड्रोममुळे हा आजार होतो. या आजारात सुमारे 70 टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडतात किंवा त्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन न्युरोलॉजीकल अक्षमता आढळून येतात.

सर्व अंगणवाडी केंद्र, खाजगी व शासकीय शाळा अंतर्गत 1 वर्ष ते 15 वर्षाखालील सर्व बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि शालेय शिक्षण विभागाचा (माध्यमिक व प्राथमिक) यांच्या सयुक्त विद्यमाने ही लसीकरण मोहीम आयोजित करण्यात येणार आहे.

लसीकरणाकरीता 3 हजार 728 एवढे लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असून एकूण 574 लस टोचकद्वारे लस दिली जाणार आहेत. याकरीता एकूण 529 पथके तयार करण्यात आले असून यामध्ये 2 हजार 960 आशा कार्यकर्त्या, 4 हजार 761 अंगणवाडी सेविका व 7 हजार 395 शिक्षक तसेच 168 पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे, असेही श्री. डूडी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!