जीएसटीचे जाचक नियम रद्द करा,कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स ची मागणी, एक दिवसाचा भारत व्यापार बंद !
अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ

जीएसटीचे जाचक नियम रद्द करा,कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स ची मागणी, एक दिवसाचा भारत व्यापार बंद !
अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ
बारामती वार्तापत्र
देशात दोन हजार सतरा सालि जीएसटी कर प्रणाली लागू करण्यात आली. या कर प्रणालीमध्ये अस्तित्वात असलेले अनेक कर समाविष्ट करून देशातील सर्व राज्यांमध्ये एकच कर प्रणाली अस्तित्वात आली यामुळे अनेक कर भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे कमी होऊन एकच कर प्रणाली मुळे हे काम सोपे होईल असे सांगितले होते.
त्यामुळे व्यावसायिक व उद्योग जगताने ही प्रणाली स्वीकारली.
मात्र या कर प्रणालीत चार वर्षात 1000 नोटिफिकेशन व सुधारणांमुळे ही कर प्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.
जीएसटी मध्ये रोज नव्या नियमांचा समावेश होत असून या बदललेल्या तरतुदी विरोधात 26 फेब्रुवारी रोजी कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स या देशातील सात कोटी पेक्षा जास्त व्यापारी व 40 हजार पेक्षा जास्त व्यवसायिक संघटनांच्या शिखर संस्थेने एक दिवसाचे भारत व्यापार बंद चे आयोजन केले आहे.
अधिकारी कोणत्याही वेळेस कोणत्याही व्यापाऱ्यांचे जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करू शकतात छोट्याश्या चुकीसाठी दंडा बरोबरच कारावासाच्या शिक्षेची नवीन तरतूद जीएसटी मध्ये करण्यात आले आहे नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आपली बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करणे हे कर दात्यांवर अन्याय करणारे आहे
जीवनावश्यक खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी नसावा, एकदा भरलेले रिटर्न आई जीएसटी ऐवजी सी जीएसटी आणि एस जीएसटी ऐवजी आय जीएसटी भरला गेला तर करदात्याला तो ॲडजस्ट करण्याची तरतूद असावी विविध प्रकारचे लेझर ठेवण्यापेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे दोन महिने रिटर्न भरले नसेल तर सदर व्यवसायिकाची e-waybill करता येत नाही त्यामुळे पुरवठादारास विनाकारण त्रास होत आहे वसुली आणि पुरवठा यासंबंधीच्या अडचणी निर्माण होतात
ईवे बिलाची वैधता 24 तासात शंभर किलोमीटर ऐवजी दोनशे किलोमीटर करण्यात आली आहे.त्यामुळे अनावश्यक अडचणी निर्माण होणार आहेत
सुट्ट्या ,बंद, एकाच वाहनातून अनेक जागी खाली होणारा माल या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही यामुळे फेडरेशनने एक दिवसाचा भारत व्यापार बंद चे आयोजन केले आहे.