भिगवणहद्दीत जुगार अड्याव राजकीय पदाधिकाऱ्यांसह नामवंत वस्तादावर गुन्हा दाखल.
१लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.

भिगवणहद्दीत जुगार अड्याव राजकीय पदाधिकाऱ्यांसह नामवंत वस्तादावर गुन्हा दाखल.
१लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.
भिगवण; क्राईम बारामती वार्तापत्र
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारीत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना ताब्यात घेतले.यात शासकीय नोकराबरोबर राजकीय पदाधिकारी ,नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिक असल्याची चर्चा आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत निंबोडी रस्तावर असणाऱ्या डोंगराजवळ हा अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांना गोपनीय बातमी द्वारे मिळाली.याअनुषंगाने भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी तातडीने छापा टाकीत ही कारवाई केली.
या कारवाईत ८ टेबलावर खेळविल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी अड्डा चालक हनुमंत माणिक थोरात (मदनवाडी ता. इंदापूर) यांच्या सह २६ जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक जीवन माने, पोलीस हवालदार अनंता वारगड, पोलिस नाईक संदीप लोंढे, केशव चौधर, नवनाथ भागवत, समीर करे, देविदास ढोले या पथकाने केली.
सदर कारवाईत तालुक्याबाहेरील विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी बरोबरच शासकीय कर्मचारी, भिगवण ग्रामपंचायतीचा माजी सदस्य, बारामती येथील नामांकित वस्ताद यांच्यावर भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आपले नाव पोलिसांच्या यादीतून काढण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही दाद न दिल्याने स्वत:ला प्रतिष्ठित समजणाऱ्या पुढाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
फिल्मी स्टाईल कारवाई.
भिगवणजवळच्या डोंगरात जुगार खेळताना एका पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगाऱ्यांना पोलिसांनी धरपकड करत ताब्यात घेतलं. नामांकीत वस्ताद २६ जणाला सोबत घेवून रिमझीम पावासात आडोशाला बसून जुगार खेळत होता मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक मयुर भुजबळ आणि सहायक पोलिस निरिक्षक जीवन माने यांनी जुगार खेळणाऱ्या नागरिकांना डोंगरात फिल्मी स्टाईल कारवाई करत ताब्यात घेतले.