क्राईम रिपोर्ट

जुन्या तक्रारीच्या कारणावरून,बारामतीत चौघांकडून एकाला बेदम मारहाण;पोलिसात गुन्हा

लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.

जुन्या तक्रारीच्या कारणावरून,बारामतीत चौघांकडून एकाला बेदम मारहाण;पोलिसात गुन्हा

लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली.

बारामती वार्तापत्र 

जुन्या तक्रारीच्या कारणावरून तिघांसह अन्य व्यक्ती अशा चार जणांनी एकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार बारामतीत घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर शंकर दळवी (रा. सिद्धेश्वर गल्ली, बारामती; सध्या रा. मळद रोड, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. अक्षय गावडे, प्रतीक राऊत, कारंडे (पूर्ण नाव, पत्ती नाही) व इतर तीन अनोळखींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांनी सन 2021 मध्ये त्यांचा मित्र गालिफ कादर सय्यद याला श्रीराम फायनान्समधून कर्ज काढण्यासाठी जामीनदार म्हणून स्वतःची कागदपत्रे दिली होती. पिसाळ नावाच्या एजंटच्या मदतीने जितू सुतार याने याच कागदपत्रांच्या आधारे फिर्यादीला जामीनदार दाखवून कर्ज काढले. ही बाब फिर्यादीला माहिती नव्हती.

त्यानंतर एजंट फिर्यादीकडे आला. सुतार याने कर्जाचे हप्ते थकवले असून, तुम्ही त्याला जामीनदार आहात, असे त्याने सांगितले. त्यामुळे फिर्यादी हे जितू सुतार याला शोधत होते. त्यामुळे त्यांनी सुतार याच्या दुकानावरील कामगार माऊली गावडे याच्याकडे त्याची चौकशी केली होती. या कारणावरून त्यांची माऊली गावडे याच्याशी बाचाबाची झाली होती. गावडेने फिर्यादीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून ते फिर्यादीला शोधत होते.

दरम्यान, फिर्यादी हे दि. 9 जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास गुणवडी चौकातील युरेका इलेक्ट्रॉनिक्स येथे कामानिमित्त आले होते. त्या वेळी तेथे पाच ते सहा युवक आले. त्यापैकी अक्षय गावडे, प्रतीक राऊत, कारंडे व इतर तिघांनी फिर्यादीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. मतू माऊली गावडेबरोबर वाद का घालतो?फ असे म्हणत त्यातील एकाने हातातील लोखंडी कडे डोक्यात जोराने मारून दुखापत केली. गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Back to top button