क्राईम रिपोर्ट

जुन्या भांडणाच्या कारणातून बारामती पाच जणांवर कोयत्याने वार…..

हातात लोखंडे कोयते आणि चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती.

जुन्या भांडणाच्या कारणातून बारामती पाच जणांवर कोयत्याने वार…..

हातात लोखंडे कोयते आणि चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती.

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील वंजारवाडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून पाच जणांवर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्लयात ५ जण जखमी झाले आहे.

ही घटना घटस्थापनेच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास वंजारवाडी येथील दत्त मंदिर समोर घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी २२ सप्टेंबर रोजी फिर्यादी अमोल आण्णा चौधर, भारत गोकुळ चौधर, सागर चंद्रकांत चौधर, आदित्य सर्जेराव चौधर, सुनिल गोरख चौधर हे सर्व व इतर नवरात्र उत्सव चालू असल्याने देवीची ज्योत राशीन येथून मौजे वंजारवाडी येथे दत्त मंदिरासमोर घेऊन आले. मंदिरासमोर पुजा पाठ करून पारंपारिक वाद्यावर उत्सव साजरा करीत होते. त्याचवेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी त्या ठिकाणी आली.

त्या चारचाकी येथून ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम कुचेकर, अली मुजावर ,दिपक भोलनकर आणि शुभम वाघ व त्यांचेसोबत असणारे दोन ते तीन अनोळखी इसम होते. त्यांच्या हातात लोखंडे कोयते आणि चाकू अशा पद्धतीची हत्यारे होती. आणि त्यानंतर या व्यक्तींनी दत्त मंदिरासमोर उभा असणाऱ्या फिर्यादी यासह त्यांच्या बंधुंवर हल्ला चढवला यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले.

गुन्हा दाखल

पोलिसांनी या घटनेनंतर ऋतिक उर्फ गुड्या मुळिक, ओम अर्जुन कुचेकर,अली मुजावर, दिपक भोलनकर आणि शुभम वाघ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .या घटनेनंतर शुभम वाघ,अली मुजावर आणि ओम अर्जुन कुचेकर या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या हल्ल्यामध्ये सुनिल चौधर,अमोल चौधर, भारत चौधर, सागर चौधर आणि आदित्य चौधर हे पाच जण जखमी झाले आहेत.

Back to top button