जेजुरीतील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला मुंबई स्फोटात मृत्यूमुखी पावलेल्या हिंदूच्या रक्ताने माखलेले हात लागल्याने केला दुग्धाभिषेक.. आमदार गोपीचंद पडळकर

पुतळ्याला दुग्धाभिषेक

जेजुरीतील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला मुंबई स्फोटात मृत्यूमुखी पावलेल्या हिंदूच्या रक्ताने माखलेले हात लागल्याने केला दुग्धाभिषेक.. आमदार गोपीचंद पडळकर

पुतळ्याला दुग्धाभिषेक

बारामती वार्तापत्र

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती महाराष्ट्रभर साजरी होत आहे याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी जेजुरी गडावर असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केलाय.. हिंदू संस्कृती व मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला मुंबई स्फोटात मृत्यूमुखी पावलेल्या हिंदूच्या रक्ताने माखलेले हात लागले होते.

त्यामुळे या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नांव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय.. या कार्यक्रमानंतर गोपीचंद पडळकर हे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी ला रवाना झाले.

Related Articles

Back to top button