जेव्हा ज्येष्ठांचे कार्य तरुणांना लाजवते तेव्हा ……
पेन्शन व लोक वर्गणी तुन ज्येष्ठ नागरिक यांनी प्रतिष्ठान स्थापन
जेव्हा ज्येष्ठांचे कार्य तरुणांना लाजवते तेव्हा ……
पेन्शन व लोक वर्गणी तुन ज्येष्ठ नागरिक यांनी प्रतिष्ठान स्थापन
बारामती वार्तापत्र
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दीना निमित्त शहरातील श्री मोरया नगर येथील ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात सामाजिक कार्यासाठी प्रतिष्ठान स्थापन करतात,वृषारोपन करतात व या पूर्वी कोरोना च्या काळात सकाळी व रात्री असे एकूण 200 लोकांना कोरोनाचे रुग्ण व नातेवाईक याना त्यांच्या मागणीनुसार शाकाहारी व मांसाहारी जेवण पुरवितात त्याची प्रसिद्धी कोठेही करत नाहीत व रक्तदान शिबिर आयोजित करतात त्याचेही प्रसिद्धी करत नाही असे कार्य ज्येष्ठ नागरिक करतात त्यामुळे तरुण पिढी ला लाजवेल आशा जोमात कार्य मोरया नगर येथील ज्येष्ठ नागरिक करीत आहेत याची चर्चा सद्या सर्वत्र जोरदार सुरू आहे.
15 ऑगस्ट रोजी श्री मंगलमूर्ती सेवा प्रतिष्ठान च्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी प्रा दिलीप कापडणीस यांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अनिल सावळेपाटील व अध्यक्ष शिवाजीराव सांवत,उपाध्यक्ष विकास देशपांडे,सचिव मुकुंद तारू,सहसचिव प्रा राजेंद्र अटफळकर,खजिनदार विकास फडतरे,सहखजिनदार बाळासो खराडे,आदित्य भातलवंडे,सुधाकर केंजगे, स्वप्नील जिरंगे,अक्षय रणसिंग, सोनू निश्चळ,अक्षय तांबे,सौ पाचपुते,मेजर मानसिंग वंजारी,सौ नम्रता काळे,राजाराम काळे,आनंद कापडणीस आदी नागरिक उपस्तीत होते.
पेन्शन व लोक वर्गणी तुन ज्येष्ठ नागरिक यांनी प्रतिष्ठान स्थापन केल्यावर विविध सामाजिक कार्य केले या नंतर आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांनी साठी शैक्षणिक संस्था उभी करणे व हृदयविकार,मधुमेह,घुडगेदुखी आदी आजारासाठी मोफत वैदकीय सेवा पुरविण्यासाठी प्रतिष्ठान कार्य करणार असल्याचे प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले.