बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक झाडे पडली, फळबागांचे ही नुकसान!
शहरातील भिगवण रस्त्यावर झाडे पडली.

बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक झाडे पडली, फळबागांचे ही नुकसान!
शहरातील भिगवण रस्त्यावर झाडे पडली.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरासह तालुक्यात अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. धुवांधार असा पाऊस बारामती आणि तालुक्यात परिसरामध्ये पडला आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाट सुरु झाला
बुधवार दुपारच्या दरम्यान वातावरणात बदल झाला. त्यानंतर हळुहळू आकाशात ढग जमा झाले. सायंकाळी साडेसहा वाजेदरम्यान पावसाने हजेरी लावली.बारामतीमध्ये साधारण १५ मिनिटे पावसाच्या सरी झाल्या. तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. उकाड्याने नागरिक हैराण झालेल होते.
तसेच वादळी वाऱ्यामुळे शहरात ठिक ठिकाणी झाड्याची फांद्या पडल्या आहेत. अनेकांच्या घरांची पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाल्याचे चित्र आहे. अनेक भागात या मुसळधार अवकाळी पावसामुळे पाणी साठले आहे.
दरम्यान, बारामती नगर परिषदेकडून शहरासह हद्दवाढ झालेल्या भागात मान्सून पुर्व कामे सुरु आहेत. या मान्सून पुर्व कामात नाल्यांची साफसफाई, नदी, ओढ्यांची साफ सफाई, रस्त्यांची दुरुस्तीची कामे, पद दिव्यांची कामे, धोकादायक झाडांच्या फांद्या कटईची कामे आदी कामे करण्यात येत आहे. या मान्सून पुर्व कामांसाठी बारामती नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करत आहेत. मात्र पहिल्याच मुसळधार अवकाळी पावसाने बारामती नगर परिषदेच्या कामांच्या फज्जा उडविल्याचे चित्र समोर आहे. अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे शहरातील अनेक भागातील गटरी तुंबल्याचे समोर आले आहे. गटरी तुंबल्याने ते पाणी रहदारीच्या रस्त्यावर आल्याने वाहतुक व्यवस्था मंदावली, तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाड्यांच्या फांद्या वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडल्याचे चित्र आहे.
अवकाळी पावसाने बारामतीकरांची मोठी दैना उडाली, अनेक ठिकाणी या अवकाळी पाऊसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने द्राक्ष शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान अवकाळी पाऊसाने होत आहे.
दरम्यान या अवेळी आलेल्या पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला. मात्र, उकड्यात भर पडल्याने बारामतीकर हैराण झाले होते.