शैक्षणिक

ज्ञानसागर गुरुकुल एआय स्मार्ट पॅनलचा वापर करणारी जिल्ह्यातील पहिली शाळा

हे एआय स्मार्ट पॅनल्स आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

ज्ञानसागर गुरुकुल एआय स्मार्ट पॅनलचा वापर करणारी जिल्ह्यातील पहिली शाळा

हे एआय स्मार्ट पॅनल्स आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलमध्ये पॅनल्सचा वापर करून अध्ययन प्रक्रिया सुलभ करून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य विकसित करण्यात व सर्जनशीलता वाढविण्यात आणि समस्या निराकरण क्षमता सुधारण्यात देखील मदत होईल.

ज्ञानसागर गुरुकुल हे या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवीन मानदंड स्थापित करण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. एआय पॅनल बोर्डचा वापर करणारे ज्ञानसागर गुरुकुल ही जिल्ह्यातील पहिली शाळा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर आटोळे यांनी सांगितले.

ज्ञानसागर गुरुकुल मध्ये पाच अत्याधुनिक एआय स्मार्ट पॅनल्स व स्मार्ट डिजिटल एलसीडीचे शाळेमध्ये वापरात आहेत यावेळी पुढे बोलताना
अध्यक्ष प्रा.सागर आटोळे म्हणाले, शाळेत आधीपासूनच २१ स्मार्ट डिजिटल एलसीडीचे कार्यरत आहेत, ज्यामुळे अध्यापन प्रक्रियेत बरीच सुधारणा दिसून आली आहे.

आता या पाच नवीन एआय स्मार्ट पॅनल्सच्या जोडणीमुळे शाळेच्या एकूण डिजिटल क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. हे नवीन पॅनल्स केवळ शिक्षकांना अधिक इंटरॅक्टिव पद्धतीने शिकवण्यास सक्षम करणार नाहीत, तर विद्यार्थ्यांना सुद्धा तांत्रिकदृष्ट्या अधिक कुशल आणि भविष्यासाठी तयार करतील.

हे एआय स्मार्ट पॅनल्स आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.
या स्मार्ट पॅनल्समध्ये व्हाईस कमांड, जेस्चर कंट्रोल, रिअल-टाईम फीडबॅक आणि वैयक्तिक शिक्षण अनुभव प्रदान करण्याची क्षमता आहे. याशिवाय हे पॅनल्स विविध विषयांसाठी विशेष करून डिझाइन केलेल्या सॉफ्टवेअरने सुसज्ज आहेत, ज्यामुळे गणित, विज्ञान, भाषा आणि कला यासारख्या विषयांना अधिक जिवंत आणि समजण्यास सोपे बनविले जाईल असेही प्रा आटोळे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!