स्थानिक

ज्ञानसागर गुरुकुल मध्ये होळी व महिला दिन एकत्रित साजरा

होळी व महिला दिनाचे एकत्र कार्यक्रम

ज्ञानसागर गुरुकुल मध्ये होळी व महिला दिन एकत्रित साजरा

होळी व महिला दिनाचे एकत्र कार्यक्रम

बारामती वार्तापत्र

17 मार्च होळी व 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती तालुक्यातील सावळ गावातील ज्ञानसागर गुरुकुल, येथे एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

होळी सणाचे महत्व पटवून देण्यासाठी प्लास्टिक कचरा,विडी सिगारेट, तंभाखु व दुर्जन विचारांची होळी करण्यात आली तर 8 मार्च रोजी झालेल्या महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अश्विनी किसनराव शेंडगे (सह्ययक पोलिस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन सौ.प्रतिमाताई भरणे कायदेतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या व वैद्यकीय क्षेत्रात सौं डॉ.सुनैना विश्वनाथ नरुटे,सौ. निंबाळकर सावळ ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.आवाळे यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.

या वेळी विद्यार्थ्यांनी मदर तेरेसा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ अशा अनेक यशस्वी कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून त्यांच्या कार्याला उजाळा होम मिनिस्टर विजरट्या प्रथम क्रमांक सौ.स्वप्नाली तुकाराम खरात, द्वितीय सौ.पूजा अविराज खरात आणि तृतीय क्रमांक सौ.रुपाली अमर शिंदे या विजयी होऊन पैठणीच्या मानकरी ठरल्या.

” होळी व महिला दिनाचे एकत्र कार्यक्रम केल्याने विद्यार्थ्यांना सणाचे महत्व कळाले व महिलांना खेळाचा आनंद लुटता आला संस्कृती ,परंपरा आदी चे महत्व कळावे म्हणून ज्ञानसागर गुरुकुल कटिबद्ध असते असेही संस्थापक अध्यक्ष प्रा सागर आटोळे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!