ज्यांना शक्य आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे
डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करतच घराबाहेर पडावे. काळजी घ्या, सुरक्षित रहा
ज्यांना शक्य आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे
डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करतच घराबाहेर पडावे. काळजी घ्या, सुरक्षित रहा
बारामती वार्तापत्र
प्लाझ्मा दान करून कोरोनाग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे. तथापि काही ठिकाणी प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
प्लाझ्मा दान करा
कोविड-१९ च्या संकटाशी लढण्यासाठी प्लाझ्मा हे प्रमुख शस्त्र आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करु शकतात. त्यामुळे ‘माझे आपणांस आवाहन आहे की, आपणांस शक्य असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कृपया आपण अवश्य प्लाझ्मा दान करावे. कोरोनाच्या विरोधातील लढा अधिक बळकट करण्यासाठी आपले हे पाऊल महत्वाचे ठरेल. माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की, कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र होत आहे’, असे सुळे यांनी म्हटले आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
याशिवाय कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. मास्कचा अवश्य वापर करावा. वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. अगदी खूप गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करतच घराबाहेर पडावे. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.