ज्यां नागरिकांनी लसीकरण केले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे बारामती प्रशासनाकडून आव्हान…!
आपण लस घेतली असेल व नोंदणी राहिली असेल तरीसुद्धा तात्काळ नोंदणी करून घ्यावी

ज्यां नागरिकांनी लसीकरण केले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे बारामती प्रशासनाकडून आव्हान…!
आपण लस घेतली असेल व नोंदणी राहिली असेल तरीसुद्धा तात्काळ नोंदणी करून घ्यावी
बारामती वार्तापत्र
सध्या कोरोना ची तिसरी लाट उंबरठ्यावर असून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे याला प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनीटायझर व सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्री बरोबरच कोविड लसीकरण हे अत्यंत प्रभावी आहे.
त्यामुळे कोविड लसीकरण करून घेणे हा कोरोना पासून वाचण्यासाठी रामबाण उपाय ठरत आहे. त्यामुळे बारामतीतील सर्वच नागरिकांनी पहिला डोस राहिला असेल त्यांनी आपला पहिला डोस व ज्या नागरिकांच्या दुसरा डोस राहिला असेल अशा नागरिकांनी तात्काळ आपला दुसरा डोस नजीकच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन घ्यावा. असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अजूनही बारामतीमध्ये दुसरा डोस प्रलंबित असणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तसेच जर आपण लस घेतली असेल व नोंदणी राहिली असेल तरीसुद्धा तात्काळ नोंदणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती.
जरी कोरोना लसीकरण झाल्यानंतर आपण कोरोना पॉझिटिव्ह आलात तरी कोरोनामुळे होणाऱ्या गंभीर दुष्परिणामापासून लसीकरण झाले असल्यामुळे आपला बचाव होतो त्यामुळे प्रत्येकाने न चुकता कोरोना लसीकरण करून घ्यावे,सध्या सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस उपलब्ध आहे .त्याचप्रमाणे १५ ते १८ वयोगटातील शाळेत जाणाऱ्या तसेच शाळाबाह्य म्हणजे शाळेत न जाणाऱ्या मुलांनी देखील कोविड लसीकरण करून घ्यावे.