स्थानिक

ज्येष्ठाची मोफत दाढी कटिंग करून सामाजिक बांधिलकी

ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने कृतज्ञता गीत गाऊन आभार व्यक्त करण्यात आले.

ज्येष्ठाची मोफत दाढी कटिंग करून सामाजिक बांधिलकी

ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने कृतज्ञता गीत गाऊन आभार व्यक्त करण्यात आले.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील तांदुळवाडी या ठिकाणी असलेल्या बोरावके वृद्धाश्रमामध्ये रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मोफत दाढी व कटिंग करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आकाश पगारे या कारागीर युवकांनी’ केसांची स्वछता व डोक्यातील केसांना आजार होऊ नये ‘ या विषयी मोफत मार्गदर्शन केले केसांना लावण्याचे तेल बाटल्या देऊन ज्येष्ठ नागरिक यांच्या विषयी आदर व्यक्त केला.

या प्रसंगी बोरावके वृद्धाश्रमाचे सचिव किशोर मेहता, उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके,फकरूशेठ बोहरी, अमित बोरावके ,अभय शहा ,डॉ अजिंक्य राजे निंबाळकर डॉ, अजित आंबर्डेकर डॉ सई सातव व उद्योजक सुरेंद्र भोईटे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक किरण शेळके आदी मान्यवर उपस्तीत होते.

सुर्यनगरी मध्ये बी. ए सलून अँड टॅटूज च्या माध्यमातून व्यवसाय करताना विविध आजारामुळे सलून मध्ये ज्येष्ठ नागरिक येऊ शकत नाही म्हणून त्यांच्याच घरी जाऊन व्यवसाय करताना सदर कल्पना सुचली व उपक्रम सुरू केला सदर उपक्रम मोफत दोन दिवस चालतो सामाजिक बांधिलकी जोपासत सदर उपक्रम गेल्या नऊ वर्षांपासून राबवित असतो या माध्यमातून ज्येष्ठाची सेवा करण्याचे भाग्य लाभते व बुके, हार, तुरे ,फ्लेक्स, आदींवर खर्च न करता मोफत दाढी कटिंग चा उपक्रम राबवित असल्याचे आकाश पगारे यांनी सांगितले.

उत्तम व आदर्शवत उपक्रम असून ज्येष्ठ नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचे वृद्धाश्रमाचे सचिव किशोर मेहता यांनी सांगितले.
ज्येष्ठ लोकांची सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा व याच माध्यमातून एक प्रकारे सामाजिक भान व जाण जपली जात आहे अत्याधुनिक तंत्रज्ञांनाच्या युगामध्ये ही सेवा जगा साठी आदर्शवत असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक डॉ अजिंक्य राजे निंबाळकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने कृतज्ञता गीत गाऊन आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Back to top button