पुणे

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन

देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ऑटोमाबईलचे माजी अध्यक्ष 

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन

देशातले प्रमुख उद्योगपती आणि बजाज ऑटोमाबईलचे माजी अध्यक्ष

पुणे :प्रतिनिधी

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी उपचारादरम्यान निधन झालं आहे.  बजाज हे गेल्या काही काळापासून  कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी  श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.

राहुल बजाज यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. मात्र त्यांची रुबी हॉल क्लिनिकध्ये प्राणज्योत माळवली. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  त्यांच्या जाण्याने विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

राहुल बजाज यांची कारकीर्द

  • राहुल बजाज हे 1965 साली बजाज ग्रुपचे चेअरमन झाले.
  • 2005 साली ते चेअरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक झाले.
  • राहुल बजाज हे 2006 ते 2010 या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले.
  • 2016 च्या फोर्ब्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज हे 722 व्या क्रमांकावर होते.

तेव्हा राहुल बजाज यांनी राजीव यांना मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवली होती. यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सची देश-विदेशातून मागणी वाढीस लागली.

Back to top button