
ज्येष्ठ नागरिक यांचे अनुभव मार्गदर्शन म्हतपूर्ण :अजित पवार
बारामती दर्शन चा शुभारंभ संपन्न
बारामती वार्तापत्र
ज्येष्ठ नागरिक यांचे वय झाले म्हणजे काल बाह्य झाले नाही तर त्यांचे अनुभव व मार्गदर्शन समाज्यासाठी व प्रत्येकाच्या जीवनात म्हतपूर्ण आहे त्यामुळे त्यांचा आदर करावा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
तांदुळवाडी येथील ज्येष्ठ नागरिक निवास बोरावके वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिक यांच्या साठी बारामती दर्शन या सहलीचे रविवार २३मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी.
संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर मेहता, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र बोरावके, सेक्रेटरी फखरूद्दीन कायमखानी, खजिनदार डॉ. सौ. सुहासिनी सातव, सह खजिनदार डॉ. अजिंक्य राजेनिंबाळकर, विश्वस्त व आर्किटेक्ट अभय शहा, विश्वस्त अमित बोरावके, डॉ. अजित अंबर्डेकर, सौ. योजना देवळे व्यवस्थापक गणेश शेळके व ज्येष्ठ नागरिक उपस्तीत होते.
सिद्धेश्वर मंदिर दर्शन सिद्धेश्वर मंदिराजवळील बाबूजी नाईक वाडा काशी विश्वेश्वर मंदिर, एसटी स्टँड, कॅनल रोडवरील सुशोभीकरण, नगरपालिका पंचायत समिती, भिगवन रोडवरील ब्युटीफिकेशन विद्या प्रतिष्ठान येथी शरद पवार यांचे संग्रहालय विद्या प्रतिष्ठान मधील कॅम्पस नक्षत्र गार्डन, गदिमा व कन्हेरी या ठिकाणी होणाऱ्या शिवसृष्टीला भेट देण्यात आली. यावेळी शिवसृष्टीची निर्मिती कशा प्रकारे केली जाईल शिवसृष्टी मध्ये कोण कोणती ठिकाणी असतील याची चित्रफित या ठिकाणी दाखवण्यात आली.
कन्हेरी फॉरेस्ट या ठिकाणी भेट देऊन फॉरेस्ट सफारी करण्याचा आनंद वृद्धांनी घेतला व विमानतळ पाहण्याचा आनंद वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांनी घेतला आभार डॉ अजिंक्य राजे निंबाळकर यांनी मानले.