झारगडवाडीच्या महिलांनी बारामतीच्या प्रांत कार्यालयासमोर सुरू केलेले लाक्षणिक उपोषण दोन दिवस केले स्थगित…
बारामतीच्या तहसील कार्यालयाकडून पंचायत समिती, ग्रामपंचायत व बांधकाम विभागाला रस्ताची पाहणी करून मार्ग काढण्याचे केले आदेश..

झारगडवाडीच्या महिलांनी बारामतीच्या प्रांत कार्यालयासमोर सुरू केलेले लाक्षणिक उपोषण दोन दिवस केले स्थगित…
बारामतीच्या तहसील कार्यालयाकडून पंचायत समिती, ग्रामपंचायत व बांधकाम विभागाला रस्ताची पाहणी करून मार्ग काढण्याचे केले आदेश..
बारामती वार्तापत्र
झारगडवाडी (बारामती) येथील महिलांनी गट नंबर 460 मध्ये राहत असलेल्या घराकडे शासनाकडून मंजूर असलेला राज्य मार्ग 120 धुळदेव माणिक बोरकर रस्ता पक्का होत नसल्याने प्रांत कार्यालयासमोर जागतिक महिला दिनापासून महिलांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले होते याबाबत तहसील कार्यालाकडून रस्त्याबाबत तोडगा काढण्यासाठी बारामती पंचायत समिती कार्यालय, झारगडवाडी ग्रामपंचायत, व बारामती पंचायत बांधकाम विभाग यांना रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आल्याने महिलांचे लाक्षणिक उपोषण स्थगित झाले आहे..
झारगडवाडी येथील महिलांनी जागतिक महिला दिनापासून घराकडे येणारा शासनाकडून मंजूर असलेला रस्ता शरद पवार यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने राजकीय द्वेषापोटी आणि मानसिक त्रास देण्याच्या हेतूने अडवल्यामुळे बारामतीच्या प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते याबाबत अनेक वृत्तपत्र आणि माध्यमांमध्ये उपोषणा संदर्भात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रशासकीय यंत्रणेने महिलांच्या उपोषणाची दखल घेत मंगळवारी 11 मार्च 25 रोजी झारगडवाडीत रस्त्याची स्थळ पहाणी करून रस्त्याबाबत तोडगा काढण्याचे उपोषणकर्त्या महिलांना आश्वासित करण्यात आले आहे.
कोट : जागतिक महिला दिनापासून मी व अनेक महिलांनी आमच्या घराकडे शासनाकडून मंजूर असलेला रस्ता पक्का होत नसल्याने बारामतीच्या प्राण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते यावर तहसील कार्यालयाकडून आमच्या उपोषणाची दखल घेण्यात आली आहे. तहसील कार्यालयाकडून रस्त्याबाबत बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती बांधकाम विभाग, तसेच झारगडवाडी ग्रामपंचायत यांना मंगळवारी रस्त्याची पाहणी करून मार्ग काढण्याचे आदेश केले आहेत यामुळे मी सुरू केलेले लाक्षणिक उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे. मात्र रस्त्याबाबत मार्ग न निघल्यास तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेले लाक्षणिक उपोषण पुन्हा दोन दिवसांनी प्रांत कार्यालयासमोर सुरू करणार असल्याचे उपोषणकर्त्या वनिता बोरकर व छाया बोरकर यांनी सांगितले आहे.