स्थानिक

झारगडवाडीत पार पडली इफ्तार पार्टी..

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची प्रमुख उपस्थिती..

झारगडवाडीत पार पडली इफ्तार पार्टी..

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची प्रमुख उपस्थिती..

बारामती वार्तापत्र

झारगडवाडी गावात हिंदू-मुस्लीम ऐक्‍याचे दर्शन पहायला मिळाले गावातील मशीद समोरच बजरंगबली यांचे मंदिर आहे. देश आर्थिक महासत्ता बनवायचा असेल तर एकोपा असणे गरजेचे आहे. देशात अमन शांती रहावी यासाठी मशिदीत मुस्लिम बांधवांकडून म्हटलं जातं, सध्या भोंग्या वरून वाद करत बसण्यापेक्षा गावात शहरात एकोपा जपण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करायचे आहे. देशावर प्रेम जेवढे हिंदूचे आहे तेवढेच प्रेम मुस्लीम बांधवांचे देखील आहे जुन्या मंडळींनी आजपर्यंत हा एकोपा आजपर्यंत जपलेला आहे. आता पुढील पिढीने देखील एकोपा जपण्याचे काम करावे असे आव्हान बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले आहे. ते झारगडवाडीत आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी निमित्त बोलत होते..

झारगडवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष गोरख बोरकर व ग्रामपंचायत सदस्य अजित बोरकर यांच्या वतीने झारगडवाडीत सोमवारी सायंकाळी ( ता. 3 ) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस नाईक अमोल नरुटे, पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव बंडगर, रहीम सय्यद, अल्ताफ सय्यद, सल्लाउद्दीन मुलाणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Back to top button