झारगडवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र बोरकर यांची बिनविरोध निवड..
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टंकसाळे अध्यक्षतेखाली पार पडली.
झारगडवाडी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र बोरकर यांची बिनविरोध निवड..
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टंकसाळे अध्यक्षतेखाली पार पडली.
बारामती वार्तापत्र
झारगडवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटी ही १९११ साली स्थापन झाली असून, वडीलधाऱ्यानी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेची निवडणूक लागू नये म्हणून गावातील पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले होते. आणि आता चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक देखील बिनविरोध करत एकोप्याचे दर्शन घडवले आहे.
दोन्ही पदाची साधक बाधक चर्चा करून निवडणुक न लावता एकमताने चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदे एकमताने निवडण्यात आली. बारामती प्रशासकीय भवनात असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात चेअरमनपदी राजेंद्र बोरकर यांची तर व्हॉइस चेअरमनपदी भिवाजी बनकर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टंकसाळे व सहाय्यक अधिकारी अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी मावळते चेअरमन प्रकाश बोरकर, छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, धुळाबापू बोरकर, दादासो बोरकर दिलीप झारगड, प्रवीण बोरकर, नितीन शेडगे, रमेश बोरकर, संतोष मासाळ, बाळासाहेब निकम, मारुतराव साळुंके, सचिव अंकुश बोरकर, व सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थितीत होते.
कोट – देश स्वतंत्र होण्यापूर्वी वडीलधाऱ्यांनी रोपटे लावून स्थापन केलेली झारगडवाडी विविध विकास कार्यकारी सोसायटीचा आज वटवृक्ष झाला आहे. या संस्थेची स्थापना 1911 साली झाली आहे या संस्थेची स्वतःची लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. भविष्यात सर्व संचालक मंडळ आणि सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेसाठी भव्य प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. ही संस्था आर्थिक दृष्ट्या तालुक्यात एक नंबर आणण्याचा माझा मानस असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र बोरकर यांनी सांगितले आहे.