टाटा नेशन व जर्मा वेलनेस च्या संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिर संपन्न
डोळ्याची व्यवस्थित काळजी कशी घ्यावी
टाटा नेशन व जर्मा वेलनेस च्या संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिर संपन्न
डोळ्याची व्यवस्थित काळजी कशी घ्यावी
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये शुक्रवार दिनांक ११/१०/२०२४ रोजी टाटा नेशन व जर्मा वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जर्मा वेलनेसच्या डॉ. साक्षी कोले व डॉ.ओंकार सावंत यांनी या शिबिरात इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली.
निकटदृष्टीदोष हा आज-काल सर्वसामान्यपणे वय वर्षे वीसच्या पूर्वी निदर्शनास येतो आहे आणि याचा परिणाम दूरदृष्टी वर देखील होताना दिसत आहे.
आपण आपल्या जवळच्या अंतरावर असणारया गोष्टी सहज पाहू शकतो परंतु दूर अंतरावर असणारया दुकानांवरील किंवा रस्त्यावरील पाट्या वाचताना अडचण येते.
डोळ्याची व्यवस्थित काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने हे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या तपासणीनंतर दृष्टीदोष विषयीचा सविस्तर अहवाल व डोळ्यांसाठी पूरक आहार विषयक सूचना देण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी समिती अंतर्गत दीपा भोईटे व राधिका प्रक्टूर या शिक्षिकांनी या कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरित्या केले