टिक टॉक ने गुलीगत धोका दिला- सुरज चव्हाण.
नवीन भारतीय ॲप्स आल्यास पुन्हा राडा करणार
बारामती:-सिद्धार्थ मखरे
भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सीमेवर सुरू असलेल्या वादांमुळे भारत सरकारने चीनच्या ५९ ॲप्स वर बंदी घातली. या ५९ ॲप्समध्ये टिकटॉक या ॲपचा देखील समावेश होता. टिक टॉक च्या माध्यमातून स्वतःची व्हिडिओ बनवून अनेक नवख्या कलाकारांना प्रसिद्धी मिळाली होती.
सुरज चव्हाण यांचा हा व्हिडीओ पहा.
बारामती तालुक्यातील मोरटी मुर्वे गावचा रहिवासी असणारा सुरज चव्हाण हा या पैकी एक टिक टॉक वर फेमस असल्याने त्याला विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवलं जात होतं काही प्रमाणात त्याला मानधन ही मिळत होत सूरजचे फॅन फॉलोअर्स १५ लाखाच्या पुढे होते व त्याच्या व्हिडीओ ला जवळपास ४ कोटी लोकांनी पसंती दिली होती.
परंतु सध्या टिक टॉक बंद पडल्याने सुरज चव्हाण नाराज आहे त्याचे म्हणणे आहे की टिक टॉक ने आपल्याला गुलीगत धोका दिला आहे. परंतु त्याला हे ही माहिती आहे की हा ॲप्स का बंद झाला त्यामुळे त्याला देशाबद्दल अभिमान वाटत आहे.
टिक टॉक बंद झाले असले तरी लवकरच देशी बनावटीचे नवीन ॲप्स येईल व आपण पुन्हा गुलीगत त्यावर राडा करू असे त्याचे म्हणणे आहे.सध्या सुरज ला दिवसाला १ हजार च्या पुढे कॉल्स तसेच अनेक फॅन्स चे व्हिडिओ कॉल्स येत आहेत काही लोक तर आपली मुलं झोपत नाहीत एक गुलीगत डॉयलॉग ऐकीव असे म्हणत सुरज ला फोन करत आहेत असे सुरजने या वेळी सांगितले.
विशेष म्हणजे सुरज चव्हाण हा परिस्थितीने अत्यंत गरीब असून तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. सुरजला ५ बहिणी असून त्यापैकी ४ बहिणींचे लग्न झाले असून अद्याप एक बहिण अविवाहित आहे. सध्या गावामध्ये नुकतेच त्याचे घराचे बांधकाम सुरु असून आलेल्या अडचणीमुळे त्याला आर्थिक मदतीचे आवाहन त्याचे सहकारी मित्र नानासाहेब मदने व आकाश वाघमारे यांनी केले आहे.
आपण आत्ता युट्युब वर गुलीगत येणार असल्याचं त्याने म्हंटले असून ब्रॅण्ड इज ब्रॅण्ड….बुक्कीत टेंगुळ सुरज चव्हाण लय बेक्कार….एस क्यू आर क्यू झेड क्यू.. हे त्याचे विनोदी डायलॉग परत एकदा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार हे मात्र नक्की…