शैक्षणिक

टि.सी महाविद्यालयातील बीबीए(सीए) व बीसीए विभागाचे  मिटकॉन प्रा. लि., पुणे यांच्याशी एमओयू स्वाक्षरी

रोजगार संधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

टि.सी महाविद्यालयातील बीबीए(सीए) व बीसीए विभागाचे  मिटकॉन प्रा. लि., पुणे यांच्याशी एमओयू स्वाक्षरी

रोजगार संधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

बारामती वार्तापत्र 

दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (स्वायत्त) येथील बीबीए(सीए) व बीसीए विभागांमध्ये मिटकॉन प्रा. लि., पुणे या प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

या एमओयू अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, सल्ला सेवा (Consultancy), उद्योग-अभ्यास (Industry Exposure) तसेच प्लेसमेंटसाठी सहाय्य मिळणार आहे.

या MoU वर प्राचार्य डॉ. अविनाश जगताप आणि मिटकॉनचे प्लेसमेंट प्रमुख श्री. किरण पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या.या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास आणि रोजगार संधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, असे  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगताप यांनी यावेळी अनुमोदित केले.

हा उपक्रम फॅकल्टी डीन आणि उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.या वेळी मिटकॉनचे सिनिअर डेव्हलपर श्री मेघराज भोसले, प्रा. विशाल शहा  (बीसीए विभाग प्रमुख), प्रा. सलमा शेख (बीबीए(सीए) विभाग प्रमुख)  उपस्थित होते.
Back to top button