भिमाई आश्रमशाळेत राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण संपन्न..
शाळेच्या मैदानात पेवर ब्लॉक बसून देणार असल्याचा शब्द यावेळी विद्यार्थ्यांना भरणेंनी दिला

भिमाई आश्रमशाळेत राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण संपन्न..
शाळेच्या मैदानात पेवर ब्लॉक बसून देणार असल्याचा शब्द यावेळी विद्यार्थ्यांना भरणेंनी दिला
इंदापूर
येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने शनिवारी (दि.२०) शिवराज्याभिषेक सोहळा शिल्प, प्राचार्या कार्यालय,लोक प्रबोधनकार आण्णाभाऊ साठे ग्रंथालय, गोजाई गार्डन व तुळसामाई गार्डनच्या कोनशिलेचे उद्घाटन ना. दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री सार्व. बांधकाम , मृद, जलसंधारण, वने व सामान्य प्रशासन विभाग महा.
राज्य) यांच्या हस्ते पार पडले. मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा वेग उत्तम असून, त्यांच्यावर उत्तम संस्कार, चांगला सांभाळ करत त्यांच्या आरोग्याची काळजी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे तात्या आणि संस्थेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग घेत असल्याचे पाहून खूप समाधान वाटले असे आपल्या भाषणात भरणे म्हणाले .
मंत्री भरणे पुढे म्हणाले की, पुढच्या वर्षीपर्यंत येथील विद्यार्थी फुफुट्यात बसणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे.शाळेच्या मैदानात पेवर ब्लॉक बसून देणार असल्याचा शब्द यावेळी विद्यार्थ्यांना भरणेंनी दिला.तसेच संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर नेण्याचे काम मखरे तात्यांनी केले आहे. शाळेचा सर्व परिसर पाहून मला खूप आनंद झाला असे शेवटी भरणे आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी ना.भरणे यांच्या हस्ते भिमाई आश्रमशाळेचे सहशिक्षक राजेंद्र सोनवणे यांचा उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल आणि संस्थेच्या हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या वतीने गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तसेच गलांडवाडी २ च्या नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे,उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, सचिव ॲड. समीर मखरे, शकुंतला मखरे , गलांडवाडी २ च्या सरपंच सौ. आशाताई गलांडे, माजी सरपंच,गोपीचंद गलांडे, विलास शिंदे,विद्याताई शिंदे, दिपक जाधव,वसंतराव साळवे( पुणे), बाळासाहेब वाघमारे, अनिल अवचरमल, रंजना शिंदे, भास्कर साळवे,दत्तात्रय तोरस्कर,विशाल चंदनशिवे,नाना चव्हाण,संजय कांबळे, बाबजी भोंग, गोरख तिकोटे, संतोष शेंडे,दिपक मगर,वसीम शेख,सर्व पत्रकार बांधव आणि संस्थेतील विद्यार्थी, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम ॲड.समीर मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.






