स्थानिक

टीसी कॉलेजमध्ये डिजीटल मार्केटींगची कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील ११५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

टीसी कॉलेजमध्ये डिजीटल मार्केटींगची कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील ११५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

बारामती वार्तापत्र

सध्या विद्यार्थ्यांचा ओढा डिजीटल मार्केटिंग शिकण्याकडे आहे. त्यामुळेच विद्यार्थ्याना या विषयाची सखोल माहिती देण्यासाठी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि महाशाला डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल मार्केटिंग ट्रेंड्स-२०२२ ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन मा.प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले तर मा. योगेश महामुनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टीसी कॉलेजमधील बी.व्होक रिटेल मॅनेजमेंट विभागामार्फत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १७ ते २४ जानेवारी दरम्यान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील ११५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. डिजिटल मार्केटिंग ट्रेंड्स-२०२२ कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना डिजिटल मार्केटिंगसाठी उपयुक्त असणारे सर्व प्रकारचे अॅप्लीकेशन शिकवण्यात आली आणि त्याचे प्रात्यक्षिकही करुन घेण्यात आले.

महाशाला डॉट कॉमचे योगेश महामुनी, रंजना खांडेकर, अनुपमा शेडबाळे, सायली सावंत, प्रसाद जडे, विष्णू अवचार आणि मानसी घोडके यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या सांगता समारंभामध्ये उप-प्राचार्य डॉ.अजित तेळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिजीटल मार्केटींग क्षेत्र ही येत्या काळाची गरज आहे आणि या क्षेत्रात उपलब्ध असणा-या संधींचे विद्यार्थ्यांच्या करियरमध्ये मोलाचे योगदान असेल असे प्रतिपादन त्यांनी केले.

संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन आणि यशस्वी आयोजन बी.व्होक रिटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रा.महेश फुले, प्रा.अमृता बापट आणि प्रा.सुधीर तावरे यांनी केले.

Related Articles

Back to top button