स्थानिक

टीसी महाविद्यालयामध्ये पार पडला वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ

विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेत शिक्षण घ्यावे - डॉ. संजय चाकण

टीसी महाविद्यालयामध्ये पार पडला वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ

विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेत शिक्षण घ्यावे – डॉ. संजय चाकणे

बारामती वार्तापत्र

येणारा काळ हा संशोधनाधिष्ठ शिक्षणचा आहे. जोपर्यंत विद्यार्थी शिक्षणाचा आणि रोजच्या जगण्याचा संबंध लावत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांचा विकास होणार नाही. विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेत ज्ञानार्जनाकडे लक्ष देण्याची गरज आहे; असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना दिला. बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविदयालयाच्या वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चाकणे उपस्थित होते.

टीसी कॉलेजच्या जीवराज सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला.

बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयमध्ये नुकताच वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री जवाहर शहा वाघोलीकर, अध्यक्ष अनेकांत एज्युकेशन सोसायटी, बारामती हे होते तर डॉ. संजय चाकणे व्यवस्थापन समिती सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे  पदाधिकारी श्री. विकास शहा लेंगरेकर, चंद्रवर्धन शहा मुंबईकर, श्री. सत्यजित शहा पंदारकर, डॉ. जयप्रकाश शहा यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य तुळजाराम डॉक्टर चंद्रशेखर मुरूमकर यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना प्रा. मुरुमकर यांनी महाविद्यालयाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुशंगाने सुरु असलेल्या तयारीची माहिती उपस्थितांना दिली.

डॉ. संजय चाकणे यांनी येणा-या काळात विद्यार्थ्यांसमोर नव्याने येऊ घातलेल्या संधींविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करत असल्याचे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक
केले.
महाविद्यालयामध्ये दरवर्षी होणा-या मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी बक्षिस वितरण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वादविवाद स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. बारामतीमधील अनेक मान्यवरांकडून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रोख बक्षीसेही दिली जातात. त्यांचे यावेळी वितरण करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये यश मिळवलेल्या प्रेरणा बनकर, सुरज मोरे, आणि शुभम शिंदे तसेच आयआयटी जॅम परिक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल टीवायबीएससीचा श्रेयस धुमाळ या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महाविद्यालयातील गणित विभागाचे विभागप्रमुख डॉ. सदाशिव पुराणिक यांनी पारितोषिक वितरणाचे वाचण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रंजना नेमाडे यांनी केले. प्रा. संजय शेंडे आणि प्रा. विवेक बळे यांनी सुत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button