टी.डी.एफ शिक्षक संघटनेच्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी श्री वैभव यादव यांची निवड
शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार
टी.डी.एफ शिक्षक संघटनेच्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी श्री वैभव यादव यांची निवड
शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी एफ)ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज वाघोली या ठिकाणी कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली या महाविद्यालयात पार पडली.
यावेळी या संघटनेचे महाराष्ट्राचे कार्यवाहक श्री के.एस. ढोमसे यांनी महाराष्ट्राची नवीन कार्यकारणी जाहीर केली.यावेळी या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री जी.के.थोरात यांनी निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून श्री मुक्ताबाई विद्यालय,शेळगाव विद्यालयाचे उपशिक्षक आणि रयत को. ऑपरेटिव्ह बँक बारामती शाखेचे स्वीकृत संचालक श्री वैभव यादव यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी टी.डी एफ चे श्री अशोक देवकर,श्री भागवत घुले,श्री निलेश गायकवाड,श्री सुनील आदलिंग,दौंड तालुका अध्यक्ष श्री सुनील ताकवणे तसेच अनेक सभासद उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.तसेच शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार असल्याचे मत वैभव यादव यांनी व्यक्त केले.