टी.सी. महाविद्यालयाच्या श्रेयस धुमाळ चे राष्ट्रीय स्तरावरील गणित स्पर्धेत घवघवीत यश
श्रेयस धुमाळ हा टी. वाय. बी.एस्सी. गणित या वर्गात शिक्षण घेत आहे.
टी.सी. महाविद्यालयाच्या श्रेयस धुमाळ चे राष्ट्रीय स्तरावरील गणित स्पर्धेत घवघवीत यश
श्रेयस धुमाळ हा टी. वाय. बी.एस्सी. गणित या वर्गात शिक्षण घेत आहे.
बारामती वार्तापत्र
एस.पी. कॉलेज पुणे व होमी भाभा सायन्स सेंटर, टी.आय. एफ.आर. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणा-या माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशन या राष्ट्रीय स्तरावरील गणित स्पर्धेत अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचा विदयार्थी श्रेयश धुमाळ याने विशेष रँक मिळविली. त्याच्या या यशाबद्दल दि. २४ मार्च, गुरुवार या दिवशी माधवा मॅथेमॅटिक्स कॉम्पिटिशन प्रमुख डॉ.व्ही.एम.सोलापूरकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक
देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये आयआयटी,आयआयएसईआर, सीएमआय या भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात व यश मिळवतात त्यामुळे हे यश विशेष कौतुकास्पद आहे. श्रेयस धुमाळ हा टी. वाय. बी.एस्सी. गणित या वर्गात शिक्षण घेत आहे.
त्याच्या या वाटचालीत त्याला गणित विभागातील प्राध्यपकांनी मार्गदर्शन केले. या निमित्ताने प्रा.डॉ.व्ही.एम.सोलापूरकर यांनी भारतीय
गणिततज्ञ माधवा व राष्ट्रीय स्तरावरील गणित स्पर्धा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी कोरोना काळातील शैक्षणिक आव्हानांवर मात करून बाकी विद्यार्थी देखील असेच यश संपादन करतील असा विश्वास व्यक्त केला व श्रेयस धुमाळ व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले.
श्रेयस धुमाळ यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शहा, सचिव मिलिंद शहा, सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर, सर्व उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.