शैक्षणिक

टी. सी. महाविद्यालयात ‘थ्रू द फ्रेम्स फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनास’ सुरुवात

राज्यासह देशभरातील फोटोग्राफर सहभागी

टी. सी. महाविद्यालयात थ्रू द फ्रेम्स फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनास’ सुरुवात

राज्यासह देशभरातील फोटोग्राफर सहभागी

बारामती वार्तापत्र

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन तर्फे आयोजित थ्रू द फ्रेम्स  फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. दरवर्षी जागतिक छायाचित्र दिवसाचे औचित्य साधून हे प्रदर्शन भरवले जाते. यावर्षीचे प्रदर्शनाचे ११ वे वर्ष आहे. राज्यातील विविध जिल्ह्यासह देशभरातील १३५ व्यावसायिक फोटोग्राफर आणि विद्यार्थ्यांचे दोनशेपेक्षा जास्त फोटो प्रदर्शनात पाहता येणार आहेत. महाविद्यालयातील व्होकेशनल सेंटर येथे मंगळवार दि. १९ रोजी प्राचार्य प्रा.डॉ. अविनाश जगताप यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे उदघाटन झाले यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपप्राचार्य डॉ.योगिनी मुळे, डॉ.सचिन गाडेकर, डॉ.अरुण मगर, रजिस्ट्रार अभिनंदन शाह, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ.निरंजन शाह, विभागप्रमुख सहायक प्रा.राहुल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्याना आज बुधवार दि. २० रोजी सायंकाळी ४ वाजता सुप्रसिद्ध  फोटोग्राफर गणेश बागल यांच्या हस्ते बक्षिस वितरण केले जाणार आहे.

बारामतीकरांना उत्कृष्ट फोटो पाहण्याची संधी

निसर्ग, व्यक्ती आणि ठिकाण या विषयांवर आधारित स्पर्धकांनी काढलेले विविध वास्तु , कलात्मक, रंगाविष्कार तसेच गंभीर आशय व्यक्त करणाऱ्या फोटोजसह जंगलातील प्राणी, पक्षी यांचे फोटो (वाईल्डलाईफ फोटोग्राफी) , मॉडेलिंग ग्रामीण, सामाजिक प्रश्न मांडणारे  फोटोज बारामतीकरांना पाहता येतील. हे प्रदर्शन बुधवार दि २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु असून सर्वांसाठी खुले असणार आहे.

Related Articles

Back to top button