शैक्षणिक
टी सी महाविद्यालयात मुलाखत कौशल्य आणि ए-आय तंत्र कार्यशाळेचे आयोजन
हि कार्यशाळा दि ०३ ते १३ जून याकालावधी मध्ये महाविद्यालयातील व्होकेशनल हॉल येथे सुरु आहे.

टी सी महाविद्यालयात मुलाखत कौशल्य आणि ए-आय तंत्र कार्यशाळेचे आयोजन
हि कार्यशाळा दि ०३ ते १३ जून याकालावधी मध्ये महाविद्यालयातील व्होकेशनल हॉल येथे सुरु आहे.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि मँजीक बस फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
पदवी पास विद्यार्थ्यांसाठी मुलाखत तंत्र आणि कौशल्य संदर्भात दहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पदवी पास विद्यार्थ्यांसाठी मुलाखत तंत्र आणि कौशल्य संदर्भात दहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर, प्राँम्पट इंजीनियरिंग आणि चॅट जीपीटीचा वापर याविषयी ट्रेनिंग देण्यात येत आहे. या
कार्यशाळेकरिता मँजीक बस फाऊंडेशनचे मास्टर ट्रेनर शुशील धावांडकर, निखील पवार, प्रमोद भालेराव, संस्कृती उपरे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
कार्यशाळेकरिता मँजीक बस फाऊंडेशनचे मास्टर ट्रेनर शुशील धावांडकर, निखील पवार, प्रमोद भालेराव, संस्कृती उपरे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
हि कार्यशाळा दि ०३ ते १३ जून याकालावधी मध्ये महाविद्यालयातील व्होकेशनल हॉल येथे सुरु आहे. या कार्यशाळेला विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून प्रात्यक्षिकाच्या
माध्यमातून चांगला सराव विद्यार्थ्यांचा करून घेण्यात येत आहे.
माध्यमातून चांगला सराव विद्यार्थ्यांचा करून घेण्यात येत आहे.
ही कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर या फाऊंडेशन कडून मेगा ड्राईव्ह घेतला जाणार आहे.
त्या मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाव्यात त्याकरिता ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे.
त्यामुळे महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन हि कौशल्य आत्मसात करावीत असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
या कार्यशाळेच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य, रजिस्ट्रार, प्लेसमेंट ऑफिसर प्रा.
महेश फुले यांनी परिश्रम घेतले.
महेश फुले यांनी परिश्रम घेतले.